(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajay Devgn Birthday: बॉलिवूडचा सिंघम आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या अजय देवगणच्या संपत्तीबाबत...
सिंघम, दृष्यम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अजय हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
Ajay Devgn Birthday: बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगणचा (Ajay Devgn) आज 54 वा वाढदिवस आहे. अजयनं हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. अजयचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अजय हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिंघम, दृष्यम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अजय हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
अजयची संपत्ती
अजय देवगणची एकूण संपत्ती 427 कोटी आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अजय हा ब्रँड एंडोमेंट देखील करतो. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अजय हा एका चित्रपटासाठी 30 ते 50 कोटी रुपये मानधन घेतो. अजयने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील कॅमिओसाठी 11 कोटी रुपये घेतले होते. तर अजय देवगणने राजामौलीच्या आरआरआरमध्ये छोट्या भूमिकेसाठी 25 कोटी रुपये घेतले आहेत.
अजयचं आलिशान घर
अजय देवगण हा मुंबईत राहतो. त्याची दोन आलिशान घरे आहेत. अजय देवगणचा जुहूमध्ये फ्लॅट आणि मालगडी रोडवर एक आलिशान बंगला आहे. रिपोर्टनुसार, या दोन्ही घरांची किंमत 25 कोटींहून अधिक आहे. टोयोटा सलीका, बीएमडब्ल्यू, फरारी यांसारख्या गाड्या देखील अजयकडे आहेत.
View this post on Instagram
अजयचे चित्रपट
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे या चित्रपटाच्या माध्यामातून अजयनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं दिलवाले,धनवान, विजयपथ, प्यार तो होना ही था या चित्रपटांमध्ये देखील काम केलं. अजय देवगणने चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. भोला या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराजने केलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या: