एक्स्प्लोर

"ऐश्वर्याला मंगळ, ज्या घरात जाईल, त्यांचं वाटोळं होईल", जेव्हा अफवांवर संतापलेले बिग बी, दिलेलं सडेतोड उत्तर

007 मध्ये जेव्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचं लग्न झालं, त्यावेळी अभिनेत्रीबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. अनेक अफवा पसरवल्या गेल्या. त्याबाबत बोलताना अमिताभ बच्चन संतापले होते.

Aishwarya Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) म्हणजे, बॉलिवूडमधील सर्वात फेवरेट कपल. दोघांनी 2007 मध्ये आपली लग्नगाठ बांधली होती. विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. पण, ज्यावेळी बीटाऊनमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या, त्याचवेळी दोघांबाबत अनेक अफवादेखील उडाल्या होत्या. ऐश्वर्या रायला मंगळ असून अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी तिचं लग्न एका झाडाशी लावण्यात आल्याचा दावा देखील त्यावेळी करण्यात आला होता. काही रिपोर्ट्समध्ये ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी अशुभ असल्याचंही म्हटलं होतं. या बातमीनं अमिताभ बच्चन संतापले आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं.

2007 मध्ये जेव्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचं लग्न झालं, त्यावेळी अभिनेत्रीबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. अनेक अफवा पसरवल्या गेल्या. ऐश्वर्या राय शुभेच्छुक असून अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी तिनं एका झाडाशी लग्न केल्याचा दावा करण्यात आला होता. काही रिपोर्ट्समध्ये ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी अशुभ असल्याचंही म्हटलं आहे. या बातमीनं अमिताभ बच्चन संतापले आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं.

एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जून 2007 मध्ये अमिताभ यांनी 'मिड डे'ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी ऐश्वर्या रायबाबतच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.

ट्रोलर्सना सडतोड उत्तर देताना काय म्हणालेली बिग बी?

ऐश्वर्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना बिग बी म्हणालेले की, "हे अत्यंत असंवेदनशील आहे. आधी तर असं समोर आलं की, तिला मंगळ होता. त्यानंतर तिचं लग्न झाडासोबत लावलं गेलं आणि आता की, ती आमच्यासाठी अशुभ आहे."

"नशिबात जे असेल ते होईल, ऐश्वर्या अशुभ नाही"

बिग बी पुढे म्हणाले होते की, "ती (ऐश्वर्या राय) कशी असेल? तिचं भविष्य काय असेल? ती ज्या घरात जाईल, तिच्या सासऱ्याचा मृत्यू होईल, याविषयी दररोज काही ना काही अंदाज लावले जातात. ऐश्वर्या आमच्यासाठी अशुभ नाही, जे नियतीला मान्य असेल तेच होईल."

"ऐश्वर्यामुळे हे झालं, ते झालं..."

अमिताभ इथेच थांबले नाहीत. त्यानंतर ते म्हणाले की, "मीडियानं अंदाज बांधणं आणि लिहिणं खूप चांगलं आहे, पण, जे लिहिलं जातं, त्यामुळे ते आणि त्यांचं कुटुंब कोणत्या परिस्थितीतून जात असेल? याचा विचार कधी केलाय का? सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, चर्चा थांबलेल्या नाहीत. हे झालं, ते झालं. हे सर्व ऐश्वर्यामुळेच झालंय, असं बोललं जातंय."

"अभिषेक-ऐश्वर्या कोणत्या परिस्थितीतून जातायत कल्पना आहे...?"

"तुम्हाला कल्पना आहे का? ती आणि अभिषेक खरोखर कोणत्या परिस्थितीतून जात आहेत? दोन व्यक्तींमधील विश्वासाशिवाय लग्न म्हणजे काय? हे दोन मनांच्या संबंधाबद्दल आहे. ती माझी पत्नी आहे आणि आयुष्यभर माझी पत्नी राहील. तेच खरं आहे.", असं बिग बी म्हणालेले. 

अभिषेक-ऐश्वर्यामध्ये सध्या चाललंय काय? 

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यात सर्वकाही ठीक नसून ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे झाल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, बच्चन कुटुंबीय किंवा अभिषेक-ऐश्वर्याकडून अद्याप कोणीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Embed widget