एक्स्प्लोर
आमीरच्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव, भूमिका ठरली
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या बहुचर्चित 'दंगल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच आमीर पुढच्या चित्रपटाची जुळवाजुळव करण्यास लागला आहे.
आमीरचा मॅनेजर अद्वैत चंदन दिग्दर्शन करत असलेल्या 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात आमीर भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात आमीर एका संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाची कथा एका टीनएजरभोवती फिरते. हा युवक आपल्या शिवराळ वडिलांच्या कचाट्यातून एका दारुड्याच्या मदतीने आपल्या आईची सुटका कशी करतो, हे या चित्रपटात दिसणार आहे.
मिस्टर परफेकशनिस्टचा भर एका वेळी एक चित्रपट करण्याकडे असतो. फोगट यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आमीर वजनाकडे लक्ष पुरवत आहे. त्यानंतर संगीतकाराची भूमिका जगण्यासाठी आमीर विशेष प्रयत्न करताना दिसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement