एक्स्प्लोर
AIB मध्ये सुनील ग्रोव्हर दिसणार नाही, रोहन जोशीकडून स्पष्ट
मुंबई : कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर कॉमेडी किंग सुनील ग्रोव्हर चर्चांच्या केंद्रस्थानी होता. सुनील ग्रोव्हर आता कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार नसला, तरी तो एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, लोकप्रिय कॉमेडी शो 'एआयबी'मध्ये सुनील ग्रोव्हर दिसणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
'एआयबी'चा होस्ट रोहन जोशीने ट्वीट करुन स्पष्ट केलंय की, सुनीलच्या 'एआयबी'मध्ये सहभागाबाबतचं विधान केवळ मस्करी होती. सुनील ग्रोव्हर एआयबीमध्ये काम करणार नाही.
https://twitter.com/mojorojo/status/846625402164580353
सुनील ग्रोव्हर भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहेत. त्यांना एआयबीमध्ये काम करण्याची गरज भासणार नाही, असेही रोहन जोशीने सांगितले.
विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांना 'द कपिल शर्मा शो'मध्ये घेण्याबाबत निर्माते उत्सुक आहेत. कारण मागील आठवड्यात राजू श्रीवास्तव हे आले असताना, शो अत्यंत चांगला झाला होता.
एएनआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील ग्रोव्हर 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतणार आहे. मात्र, कपिलच्या शोमध्ये परतण्याच्या वृत्ताचं सुनील ग्रोव्हरने खंडन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement