Unad Movie : आदित्य सरपोतदारचा 'उनाड' सिनेमागृहात होणार प्रदर्शित; 'झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त सिनेमाची निवड
Unad : 'उनाड' हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Unad Movie : जिओ स्टुडिओजचा बहुचर्चित 'उनाड' (Unad) हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'उनाड' सिनेमासंदर्भात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाला,'उनाड' हा सिनेमा तरूणांवर चित्रीत करण्यात आला असून हा सिनेमा पुढील वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा युवकांना योग्य दिशा दाखवणारा ठरेल अशी मला आशा आहे."
'उनाड' सिनेमाचं कथानक काय?
'उनाड' ही महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील हर्णे येथील मासेमारी करणाऱ्या तीन युवकांची कथा आहे. शुभ्या, बंड्या व जमील हे तीन कोणतेही ध्येय नसलेले मित्र गावात दिवसभर हुंदडतात. गावातील सर्व स्थानिक त्यांना उनाड समजत असल्याने, तिघेही अडचणीत सापडतात. त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यातील ही कहाणी आहे जी त्यांना कायमची बदलते.
View this post on Instagram
चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे पार पडलेल्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival) युवा विभागातील फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘उनाड’ची नुकतीच निवड झाली आहे.
'झ्लिन' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव आहे. हा एक अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आहे, जो मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देतो. मागील महोत्सवात सुमारे एक्याऐंशी हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सिनेमाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवात जगभरातील 52 देशांतील 310 सिनेमांचा समावेश होता.
संबंधित बातम्या