एक्स्प्लोर

Unad : आदित्य सरपोतदार यांच्या ‘उनाड’ची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड; चेक प्रजासत्ताकमध्ये होणार महोत्सव

26 मे ते 1 जून  2022 दरम्यान चेक रिपब्लिकमध्ये हा महोत्सव होणार आहे. 

Unad : जिओ स्टुडिओज आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'उनाड' (Unad) हा चेक प्रजासत्ताक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा 62 व्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival), युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. 26 मे ते 1 जून  2022 दरम्यान चेक रिपब्लिकमध्ये हा महोत्सव होणार आहे. 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, 'महत्त्वाच्या आणि संबंधित युवा वर्गात 'उनाड' ची निवड होणे ही चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोळी समाजातील सध्याच्या तरुणांचा वास्तववादी विचार करण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटात तीन तरुणांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात 'उनाड'ची निवड होणे ही आमच्या टीमच्या प्रवासाची पावती आहे. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहात आहोत विशेषतः या महोत्सवाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditya Sarpotdar (@aditya_a_sarpotdar)

'उनाड' ही महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या हर्णे येथील तीन तरुण मुलांची कथा आहे. शुभ्या, बंड्या आणि जमील हे तीन मित्र आहेत जे आपला वेळ गावात हुंदडण्यात घालवतात. त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नाही. स्थानिक त्यांना गावातील उनाड मुले समजत असल्याने, तिन्ही मुले अडचणीत येतात. त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची ही कहाणी आहे, जी त्यांना कायमची बदलते.

झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव आहे. हा एक अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आहे, जो मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देतो. मागील महोत्सवात सुमारे एक्याऐंशी हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला जगातील 52 देशांतील  310 चित्रपटांचा समावेश होता.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget