Tara Sutaria | बॉलिवूडकरांना कोरोनाचा विळखा; रणबीर कपूर पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारिया कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण झाली आहे. तारा सुतारियाने काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट तडपची शूटिंग पूर्ण केली. या चित्रपटात तारासोबत अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक देशातील कोरोना बाधितांचाही आकडा वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडकरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आणि आता या यादित अभिनेत्री तारा सुतारियाच्या (Tara Sutaria) नावाचाही समावेश झाला आहे. तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे.
फिल्मफेयरने दिलेल्या रिपोर्टनुसार, तारा सुतारियाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तारा सुतारियाने काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट तडपची शूटिंग पूर्ण केली. या चित्रपटात तारासोबत अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
तडप चित्रपटातून लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. यासंदर्भातील पोस्ट शेअर करत तारा सुतारियाने या चित्रपटासंदर्भात माहिती दिली होती. ताराने पोस्टर शेअर करताना लिहिलं की, "एक लव्ह स्टोरी अनेक भावनांसह. साजिद नाडियाडवालाची लव्ह स्टोरी तडपमध्ये जादुई अनुभव घ्या." हा चित्रपट 24 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात येईल. या चित्रपटातून अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अक्षय कुमारनेही या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तारा आणि अहानला शुभेच्छा दिल्या होत्या.
हिरोपंतीमध्ये दिसणार तारा सुतारिया
तारा सुतारिया हिरोपंती 2 मध्येही दिसून येणार आहे. हिरोपंती 2 चं पोस्टर टायगर श्रॉफच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज करण्यात आलं. रिलीज डेटची अनाउंसमेंट करण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत ऑफिशियली तारा सुतारियाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार की, नाही यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी या चित्रपटात सारा अली खान दिसून येणार होती. परंतु, ड्रग्ज केसमध्ये साराचं नाव आल्यानंतर तिच्या हातून हा चित्रपट गेल्याचं सांगितलं जातं. तसेच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफने सारा अली खानला चित्रपटातून हटवण्यासंदर्भात सांगितलं होतं. त्यानंतर हा चित्रपट ताराकडे देण्यात आला.
आदन जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तारा सुतारिया
काही दिवसांपूर्वी तारा सुतारियाने आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी तिने सांगितलं होतं की, 'मला असं वाटतं जर तुम्ही कोणासोबत रिलेशनमध्ये असाल तर ती खाजगी गोष्ट आहे. आमच्या क्षेत्रात फारच कमी गोष्टी खाजगी असतात. त्यामुळे मी समजू शकते की, का लोक आपल्या पर्सनल किंवा लव्ह लाइफबाबत काहीच बोलत नाही.' तारा आणि आदर नेहमीच एकत्र दिसून येतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :