Radhe Movie Release Date : 'या' तारखेलाच येणार सलमानचा 'राधे', सल्लूमिया म्हणाला, 'एक बार जो मैने...'
Radhe Movie Release Date : सलमानने आज एका नव्या पोस्टरसह राधे सिनेमा ईदलाच प्रदर्शित करणार असल्याचं म्हटलं आहे. सलमाननं म्हटलंय की, ईदचं कमिटमेंट केलं होतं, ईदलाच आम्ही येणार, कारण, एक बार जो मैने... असा डायलॉग मारत 13 मे रोजीच सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.
Radhe Movie Release Date : कोरोनाचा कहर आल्याने वर्षभर थिएटर्स बंद अवस्थेत होते. आता बॉलिवूडमध्ये नव्या वर्षासह अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात आता सलमानचा बहुप्रतीक्षीत 'राधे' हा चित्रपट ईदला 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाद्वारे सलमान खान पुन्हा एकदा 'राधे' बनून मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सध्या त्याचा या चित्रपटातील लुक व्हायरल होत आहे. या तारखेची घोषणा सलमानने आधीच केली होती. मात्र पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राधे या तारखेला रिलिज होईल की नाही याबाबत संभ्रम होता.
'सलमान खूपच गोड आहे'; दिशा पाटनीचा सलमानला होकार
यावर सलमानने आज एका नव्या पोस्टरसह राधे सिनेमा ईदलाच प्रदर्शित करणार असल्याचं म्हटलं आहे. सलमाननं म्हटलंय की, ईदचं कमिटमेंट केलं होतं, ईदलाच आम्ही येणार, कारण, एक बार जो मैने... असा डायलॉग मारत 13 मे रोजीच सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.
Eid ka commitment tha, Eid par hi aayenge kyun ki ek baar jo maine.......#RadheOn13thMay #2MonthsToRadhe@bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @SKFilmsOfficial @ZeeStudios_ @SohailKhan @atulreellife @ReelLifeProdn @ZeeMusicCompany pic.twitter.com/mvBxUJPSFp
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 13, 2021
सलमानच्या चित्रपटातील लुकवरून 'राधे'अॅक्शन पॅक्ड फिल्म असणार आहे. सलमान आपल्या शर्टलेस लुकसाठी प्रसिद्ध आहे. 'राधे' च्या निमित्तानं काही आलेल्या पोस्टर्सवरुन पुन्हा एकदा सल्लूचा लोकप्रिय शर्टलेस अवतार पाहायला मिळाला आहे. या सिनेमात सलमान खान सोबत दीशा पाटणी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ देखील दिसणार आहेत.
'राधे' सलमानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डान्स मास्टर प्रभू देवानं केलं आहे. तर निर्मिती सलमानचा भाऊ सोहेलनं केली आहे. सिनेमा सलमानच्या 'वॉन्टेड' सिनेमाचा सिक्वेल आहे. वॉन्टेड 2009 मध्ये रिलिज झाला होता.