एक्स्प्लोर
दुचाकीवरुन पाठलाग करणाऱ्या चाहत्याला रिचा चढ्ढाने झापलं
एका चाहत्याने मुंबईतील वांद्रे इथे दुचाकीवरुन पाठलाग केला. मात्र तिने या अतिउत्साही चाहत्याचा चांगलाच समाचार घेतला.

मुंबई : अतिउत्साही चाहते कधी कधी सेलिब्रिटींसाठी डोके दुखी ठरतात. बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढलाही असाच अनुभव आला. एका चाहत्याने मुंबईतील वांद्रे इथे दुचाकीवरुन पाठलाग केला. मात्र तिने या अतिउत्साही चाहत्याचा चांगलाच समाचार घेतला. ''रस्त्याने पायी चालणाऱ्यांसाठी आणि इतर वाहनांसाठी तुम्ही धोकादायक आहात. फोटो काढण्यासाठी साधं विचारु शकत नाही का? सुधरा'', अशा शब्दात तिने त्या अतिउत्साही चाहत्याला सुनावलं. ऑटोग्राफ आणि फोटोसाठी चाहते सेलिब्रिटींची डोकेदुखी ठरल्याचा अनुभव अनेकदा येतो. सेलिब्रिटीही चाहत्यांना कधी निराश करत नाहीत. मात्र आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असं काही आढळून आल्यास सुज्ञ सेलिब्रिटी चाहत्यांना ऐकवायलाही कमी करत नाहीत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने भररस्त्यात अतिउत्साही चाहत्यासोबत कारमधून सेल्फी घेतला होता. मात्र मुंबई पोलिसांनी वरुणला समज देत दंडही ठोठावला होता. त्यानंतर त्याने माफीही मागितली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















