Citadel Trailer Out: अॅक्शन आणि रोमान्सचा तडका; प्रियांकाच्या 'सिटाडेल' सीरिजचा ट्रेलर पाहिलात?
नुकताच प्रियांकाच्या (Priyanka Chopra) सिटाडेल सीरिजचा (Citadel) ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2 मिनट 16 सेकंदाच्या या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
Citadel Trailer Out: अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाची सिटाडेल (Citadel) ही थ्रिलर वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रियांकाची ही हॉलिवूड वेब सीरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. सिटाडेल सीरिजचा पहिले दोन एपिसोड 28 एप्रिलला स्ट्रीम केले जाणार आहेत. तसेच या सीरिजचे बाकीचे एपिसोड 26 मेपासून रिलीज केले जातील. नुकताच सिटाडेल सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2 मिनट 16 सेकंदाच्या या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. सिटाडेलचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
प्रियांकाचा ग्लॅमरस अंदाज
सिटाडेलच्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये तिनं नादिया सिंह ही भूमिका साकरली आहे. नादिया ही गुप्तहेर आहे. प्रियांकानं या वेब सीरिजमधील तिच्या डायलॉग्सचं डबिंग स्वत: केलं आहे. सिटाडेलच्या ट्रेलरमध्ये प्रियांका आणि स्टेनलीची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. प्रियांकाच्या या हॉलिवूड वेब सीरिजची भारतात देखील क्रेझ आहे. तिचे भारतातील चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सिटाडेल या वेब सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्स यांच्या AGBO या कंपनीनं आणि शो रनर डेविड वेइल यांनी केली आहे. ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेबसीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत.
पाहा ट्रेलर:
सिटाडेलची स्टार कास्ट
सिटाडेल वेब सीरिजमध्ये अभिनेता रिचर्ड मॅडेन हा मेसन केन ही भूमिका साकारणार आहे. तर स्टेनली टुकी हा बर्नार्ड ऑरलिक तसेच यामध्ये अभिनेत्री लेस्ली मैनविल ही डाहलिया आर्चर या भूमिकेत दिसणार आहे.
प्रियांकाचे आगामी प्रोजोक्ट्स
सिटाडेल वेब सीरिजसोबतच प्रियांका काही आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती 'लव्ह अगेन' या रोमॅंटिक चित्रपटात ह्यूगन आणि सेलीन डायोनसोबत काम करणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अनेकदा ती लाडकी लेक मालतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: