एक्स्प्लोर
ट्विटरवर अश्लील टिपणी, नेहा पेंडसेने घडवली अद्दल

मुंबई : नावाजलेल्या कलाकारांशी संपर्क साधण्यासाठी ट्विटर-फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. अनेक जण आपली कला सेलिब्रेटींपर्यंत पोहचवण्यासाठी याचा उपयोग करत असतानाच काही जण मात्र सोशल मीडियाचा गैरवापर करताना दिसत आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर असाच एका टवाळखोराने उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला. मस्त इन्सान (@mast_insaan) असं ट्विटर हँडल असलेल्या एका व्यक्तीने अभिनेत्री नेहा पेंडसेच्या ट्विटर अकाऊण्टवर अश्लील कमेंट केली. अनेक कलाकार अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात, मात्र नेहाने या टवाळखोराला धडा शिकवण्याचं मनावर घेतलं. संबंधित ट्वीट कोट करुन तिने आपला संताप व्यक्त केला. 'महिलांचं अशाप्रकारे कौतुक करतात का? किळस आहे. लाज वाटायला हवी' अशा शब्दात तिने त्याला झापलं.
नेहा पेंडसेच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने नेहा पेंडसेसोबत मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि टवाळाची तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी यासारख्या कलाकारांनीही नेहाला पाठिंबा देत आरोपीला धारेवर धरलं. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊण्टवरुनही या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली. पोलिसांनी नेहाला सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितलं. https://twitter.com/NehhaPendse/status/746389738261712896 https://twitter.com/NehhaPendse/status/746573316400386048 विशेष म्हणजे मस्त इन्सान या यूझरचं ट्विटर अकाऊण्ट डिलीट करण्यात आलं आहे. त्याच्यावर सायबर क्राईम अंतर्गत काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेहा पेंडसेच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने नेहा पेंडसेसोबत मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि टवाळाची तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी यासारख्या कलाकारांनीही नेहाला पाठिंबा देत आरोपीला धारेवर धरलं. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊण्टवरुनही या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली. पोलिसांनी नेहाला सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितलं. https://twitter.com/NehhaPendse/status/746389738261712896 https://twitter.com/NehhaPendse/status/746573316400386048 विशेष म्हणजे मस्त इन्सान या यूझरचं ट्विटर अकाऊण्ट डिलीट करण्यात आलं आहे. त्याच्यावर सायबर क्राईम अंतर्गत काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
मुंबई
राजकारण























