एक्स्प्लोर
मलायका अरोराने नावातून 'खान' हटवलं!
अरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतरही इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचं नाव मलायका अरोरा खान हेच होतं.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने अरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतर दोन वर्षांनी मोठं पाऊल उचचलं आहे. मलायकाने तिच्या नावातून 'खान' आडनाव हटवलं आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवरील तिचं नाव आता मलायका अरोरा एवढंच असेल.
अरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतरही इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचं नाव मलायका अरोरा खान हेच होतं. पण तब्बल दोन वर्षांनी तिने नावातून खान आडनाव काढून टाकलं आहे. मलायका 2016 मध्ये अरबाज खानपासून वेगळी झाली होती आणि मे 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या जवळीक सध्या चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका बऱ्याचदा एकत्र पाहिलं जातं. नुकतंच करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या चॅट शोमध्ये अर्जुन कपूरनेही मलायकासोबतच्या नात्यावर मौन सोडून म्हटलं होतं की, मी आता 'सिंगल' नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement