एक्स्प्लोर
विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांकडून चाहत्यांचे आभार

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
मागील आठवड्यात शुक्रवारी विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
"शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल. माझ्या वडिलांची अतिशय उत्तम काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयाच्या स्टाफचा मी आभारी आहे, असं विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्नाने सांगितलं.
रुग्णालयात विनोद खन्ना यांच्यासह त्यांची पत्नी कविता उपस्थित आहेत. विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते आधीपेक्षा फारच उत्तम आहेत. डॉक्टर लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याबाबत विचार करत आहेत. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आमचं कुटुंब आभारी आहे, असं कविता खन्ना म्हणाल्या.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच विनोद खन्ना यांचा एक फोटो व्हायरल झाला होत, ज्यात त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली दिसत होती.
संबंधित बातम्या
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्ना यांचा फोटो व्हायरल
अभिनेते विनोद खन्ना रुग्णालयात, प्रकृतीत सुधारणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
