Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष
नुकतेच एक ट्वीट शेअर करुन एका युझरनं अभिषेकला ट्रोल केलं. या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला आहे.
![Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष abhishek bachchan give response for troll calling him unemployed Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/23/a8564043a02148b1befc6a861577e5b41666493214864259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. अनेक वेळा काही नेटकरी अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल करतात. या ट्रोलर्सला अभिषेक सडेतोड उत्तर देतो. नुकतेच एक ट्वीट शेअर करुन एका युझरनं अभिषेकला ट्रोल केलं. या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला आहे.
अभिषेकनं दिलं सडतोड उत्तर
"लोक अजूनही वर्तमानपत्र वाचतात का?" असं ट्वीट करुन एका युझरला अभिषेकनं विचारलं. या ट्वीटला रिप्लाय देत एका नेटकऱ्यानं अभिषेकला ट्रोल केलं. त्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, “शहाणे लोक वाचतात तुमच्यासारखे बेरोजगार नाहीत." या ट्वीटमध्ये त्यानं हसणाऱ्या इमोजीचा वापर देखील केला. या युझरला रिप्लाय देत अभिषेकनं लिहिलं, 'ओह, या माहितीसाठी धन्यवाद पण बुद्धी आणि रोजगार यांचा काहीही संबंध नाही. याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही नक्कीच काम करत असाल. पण तुमच्या ट्वीटमधून असं लक्षात येतं की तुमच्याकडे बुद्धी नाहीये.'
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अभिषेकच्या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांना रिप्लाय दिला आहेत. एका युझरनं कमेंट केली, सर मी मोठ्या पडद्यावर तुमचं काम पाहिलं आहे. कृपया अशा ट्वीटकडे दुर्लक्ष करा.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'या लोकांना दुसऱ्यांना ट्रोल करुन आनंद मिळतो. तुम्ही चांगले अभिनेता आणि व्यक्ती आहात. कृपया अशा ट्वीटकडे लक्ष देऊ नका'
अभिषेक बच्चनच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती
अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिषेकचा दसवी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याच्या बॉब बिस्वास, लुडो,मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ब्रीद: इनटू द शॅडोज सीझन-2 ही अभिषेकची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसोबतच अमित साध, नित्या मेनन, सैयामी खेर, इवाना कौर, नवीन कस्तुरिया हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Abhishek Bachchan : 'वडिलांना थोडा आदर द्या', म्हणत अभिषेक बच्चनने सोडला शो; व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)