(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Bachchan : 'वडिलांना थोडा आदर द्या', म्हणत अभिषेक बच्चनने सोडला शो; व्हिडीओ व्हायरल
Abhishek Bachchan : अभिषेत बच्चनचा 'घूमर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Abhishek Bachchan Case To Banta Hai : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) नुकताच 'केस तो बनता है' (Case To Banta Hai) या कार्यक्रमात दिसून आला आहे. 'केस तो बनता है' हा विनोदी कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. पण या कार्यक्रमादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मस्करी करण्यात आल्याने अभिषेकला राग आला आणि त्याने कार्यक्रमाला रामराम ठोकला.
अभिषेक बच्चनला राग का आला?
'केस तो बनता है' या कार्यक्रमातील नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये सर्वत्र मजा-मस्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावर करण्यात आलेल्या एका विनोदादरम्यान अभिषेकला प्रचंड राग आला आहे. विनोदवीर परितोष त्रिपाठीसोबत त्याने त्याची नाराजी व्यक्त केली आहे. अभिषेकला प्रचंड राग आल्याने तो शूटिंग सोडून निघून गेला.
View this post on Instagram
अभिषेक म्हणाला,"आता हे अती होत आहे. तुम्ही माझी मस्करी करा. पण माझ्या वडिलांची नका करू. ते माझे वडील असल्याने त्यांच्या बाबतीत मी खूप संवेदनशील आहे. त्यांना आदर द्यायला हवा. मर्यादेत राहून विनोद करावेत. मी मूर्ख नाही", असं म्हणत अभिषेक सेटवरुन निघून जातो.
सोशल मीडियावर अभिषेक बच्चन चर्चेत
अभिषेकने गंमत केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. तर दुसरीकडे नेटकरी अभिषेकला ट्रोल करत आहेत. अभिषेकने गंमत केली आहे की खरचं त्याला राग आला आहे हे लवकरच सर्वांसमोर येणार आहे. अभिषेकचा 'घूमर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैयामी खेरदेखील या सिनेमात दिसून येणार आहेत. अमिताभ बच्चनदेखील या सिनेमाचा भाग असणार आहेत.
संबंधित बातम्या