एक्स्प्लोर
सलमानच्या तिरस्काराच्या ट्वीटला आमीरचा रिप्लाय
![सलमानच्या तिरस्काराच्या ट्वीटला आमीरचा रिप्लाय Aamirs Reply To Salmans Tweet सलमानच्या तिरस्काराच्या ट्वीटला आमीरचा रिप्लाय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/04090358/Aamir_Salman.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा बहुप्रतीक्षित दंगल सिनेमा आज रिलीज झाला आहे. दंगल सुलतानपेक्षा उत्कृष्ट असल्याची पावती सलमान खानने दिल्यानंतर आमीरनेही त्याला उत्तर दिलं आहे.
सलमान खानच्या कुटुंबाने दंगलच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. त्यानंतर सलमानने ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते, सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा आहे. आमीर तू वैयक्तिक जीवनात मला आवडतोस, मात्र व्यावसायिक जीवनात मी तुझा तिरस्कार करतो” असं ट्विट सलमानने केलं.
'सुलतान'पेक्षा आमीरचा 'दंगल' जबराट : सलमान खान
यावर आमीर खाननेही त्याच्या स्टाईलने सलमानला रिप्लाय दिला आहे. आमीरने ‘देल्ली बेल्ली’ गाण्याचा आधार घेत, तुझ्या तिरस्कारातही मला प्रेम दिसतं. आय लव्ह यू लाईक आय हेट यू’ असं ट्वीट केलं आहे. प्रदर्शनापूर्वीच आमीर खानचा दंगल तुफान चर्चेत आहे. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला दंगल, प्रेक्षकांचीही मनं जिंकेल, असा विश्वास दंगल टीमला आहे.रिव्ह्यू : कसा आहे आमीरचा ‘दंगल’?
दंगल हा सिनेमा कुस्तीपटू महावीरसिंह फोगट यांच्यावर आधारित आहे. यापूर्वी सलमान खाननेही कुस्तीवर आधारित सुलतान हा सिनेमा केला होता. दंगल या सिनेमात आमीर खानशिवाय सांक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाला समीक्षकांनी भरभरुन स्टार्स दिले आहेत. एबीपी माझानेही दंगलला पाचपैकी चार स्टार दिले आहेत. https://twitter.com/aamir_khan/status/812068307528515584अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)