एक्स्प्लोर
Advertisement
आमीरची 'वॉटर कप स्पर्धा' जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार
बीड: राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने 'पाणी फाऊंडेशन'मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत. आमीर - सत्यजीतची या कामांसाठी भन्नाट कल्पना आहे.
'पाणी फाऊंडेशन'ने 'सत्यमेव जयते वॉटर कप' या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 'पाणी फाऊंडेशन'च्या या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे.
तीन तालुक्यातील 150 गावात स्पर्धा
महाराष्ट्रातील तीन तालुक्यांमधील 150 गावं या स्पर्धेत सहभागी आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, असे हे तीन तालुके आहेत. 5 जूनपर्यंत या तीन तालुक्यांमधी जो कुणी जलसंधारणाचे सर्वोत्कृष्ट उपचार राबवेल, तो तालुका विजेता असेल. ‘पाणी अडवणे, पाणी साठवणे’ अशी संकल्पना या स्पर्धेची आहे. यातील विजेत्यांना पहिल्या क्रमांकासाठी 50 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासठी 30 लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 20 लाख रुपये बक्षीस असेल.
'वॉटर कप' स्पर्धा जोमात
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातल्या ३४ गावांमध्ये श्रमदानाला सुरुवात झाली. श्रीपतरायवाडी गावात प्रभात फेरी काढून कामाची सुरुवात करण्यात आली.
डोक्यावर जलकलश घेतलेल्या महिलांनी कलशातील पाणी मातीत ओतून पूजा केली आणि श्रमदानाला सुरुवात केली.
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातले पोलीसही या श्रमदानात सहभागी झाले होते. स्पर्धक गावांचा उत्साह पाहून पहिल्याच दिवशी २ सामाजिक संस्था या गावांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
मानवलोक ही या भागातील नावजलेली संस्था आहे, जी स्पर्धेच्या कालावधीत २ टप्प्यात स्पर्धक गावांना १.५ कोटींची मदत करणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ७५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ७५ लाखांची मदत करणार आहेत.
शेताची बांध बंदिस्ती, गाळ काढून खोलीकरण/ सरळीकरण आणि वॉटर अब्सॉरबशन ट्रेंच खोदन्यसाठी मशीनची मदत करण्यात येणार आहे.. यांच्यासह ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० लाखंपेक्षा अधिकची मदत करणार आहे.
पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, 2016 तालुका वरुड. शासन, अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बचत भवन येथे प्रबोधन सत्र आयोजिण्यात आले होते . या स्पर्धे मध्ये वरुड तालुक्यातील ५३ गावातच समावेश आहे .
संबंधित बातमी
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, दुष्काळ कायमचा हटवण्याचा आमीरचा निर्धार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement