Aamir Khan: आमिर खान मुंबई सोडून 'या' शहरात होणार शिफ्ट; 'मिस्टर परफेक्शनिस्ट' का घेतोय मायानगरी सोडण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण
Aamir Khan: आमिर हा लवकरच मुंबई सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार आहे.आमिर हा मुंबई सोडण्याचा निर्णय का घेत आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.
![Aamir Khan: आमिर खान मुंबई सोडून 'या' शहरात होणार शिफ्ट; 'मिस्टर परफेक्शनिस्ट' का घेतोय मायानगरी सोडण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण Aamir Khan to shift In chennai from mumbai here is the reason why Aamir Khan: आमिर खान मुंबई सोडून 'या' शहरात होणार शिफ्ट; 'मिस्टर परफेक्शनिस्ट' का घेतोय मायानगरी सोडण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/3c6cacd1a815322e7981d46e50a7c6531693313673868313_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आमिर हा लवकरच मुंबई सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार आहे. येत्या दोन महिन्यांत आमिर खान हा चेन्नईला शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर चेन्नईला का शिफ्ट होत आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.
आमिर का घेतोय मुंबई सोडण्याचा निर्णय?
एका वेब साइटसोबत बोलताना एका सूत्रानं सांगितले की, आमिर खान हा सर्वात आधी त्याच्या कुटुंबाचा विचार करतो. त्याची आई झीनत हुसैन या चेन्नईमध्ये राहतात. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आमिरला त्याचा सगळा वेळ आईसोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो आता चेन्नईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेत आहे. सूत्राने पुढे सांगितले की, झीनत हुसैन यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये आमिर राहणार आहे. आमिर कामासोबतच आपल्या कुटुंबालाही वेळ देतो.
आमिरचे आगामी चित्रपट
आमिरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या सितारे जमीन पर या चित्रपटाची घोषणा केली आहे. एका मुलाखतीमध्ये आमिरनं या चित्रपटाबद्दल सांगितलं, 'मी याबद्दल जाहीरपणे बोललो नाही आणि आताही मी जास्त बोलू शकणार नाही. पण चित्रपटाचं नाव सांगू शकतो. सितारे जमीन पर असे या चित्रपटाचे नाव आहे. 'तारे जमीन पर' हा भावनिक चित्रपट होता. पण 'सितारा जमीन पर' हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल." 'तारे जमीन पर' या चित्रपटासोबतच आमिरचा 'लाहोर- 1947' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी करणार आहे.
तसेच आमिर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. आमिरची लेक आयरा ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आयराचा होणारा पती नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. तो वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती.आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय उपस्थित होते.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)