Laal Singh Chaddha : आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
Laal Singh Chaddha : आमिर खानचा बहुचर्चित 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.
Laal Singh Chaddha : आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज झाला आहे. हा सिनेमा 'केजीएफ 2'चा रेकॉर्ड मोडू शकतो, असेही म्हटले जात आहे. 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यामुळे प्रेक्षक 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'लाल सिंह चड्ढा' यशस्वी होण्याची पाच कारणे आहेत.
आमिरचा सिनेमा बऱ्याच दिवसांनी होणार रिलीज
आमिर खानचा सिनेमा बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने हा सिनेमा हिट होऊ शकतो. ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला होता. त्यामुळे 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या माध्यमातून आमिर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने आमिरचे चाहते या सिनेमाचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
रिलीज डेट खास
आमिर खानने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख खूप विचारपूर्वक निवडली आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 11 ऑगस्ट दरम्यान सलग सुट्ट्या असल्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी होणार आहे. तसेच सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्डदेखील झळकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आमिर खान आणि करीना कपूरची जोडी
आमिर खान आणि करीना कपूर याआधी '3 इडियट्स' या सिनेमात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणार आहेत.
आमिरची सिनेमा निवड उत्तम
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यामुळे आमिर निराश झाला होता. त्यामुळे आमिरने नवीन कथानक असलेला सिनेमा निवडण्यापेक्षा रिमेकचा पर्याय निवडला. 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडच्या सुपरहिट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.
सेलिब्रिटींचा सिनेमा
'लाल सिंह चड्ढा' सिनेमात आमिर खानसोबत सलमान खान आणि शाहरुख खानदेखील काही सीक्वेन्स करताना दिसणार आहेत. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सलमान, शाहरुख आणि आमिर या सिनेमात असल्यामुळे हा सेलिब्रिटींचा सिनेमा आहे, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या