Ira Khan : नैराश्यानंतर आमिर खानची लेक 'या' गंभीर आजाराशी देतेय झुंज
Ira Khan : इरा खानला सध्या एंग्झायटी अटॅक्सचा (Anxiety Attacks) सामना करावा लागत आहे.
Ira Khan : आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी इरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून इरा नैराश्याला सामोरे जात आहे. अशातच इरा एंग्झायटी अटॅक्स (Anxiety Attacks) या आजाराशी झुंज देत आहे.
इरा खानने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. फोटो पोस्ट करत तिने एंग्झायटी अटॅक्स संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. तिने लिहिले आहे,"आता मला एंग्झायटी अटॅक्स येऊ लागले आहेत. मी केव्हाही घाबरते आणि कधीही रडते. हे फार भयंकर आहे".
View this post on Instagram
अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा मागे केला होता. तिने याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात इराने आपल्यावर 14 वर्षाची असताना अत्याचार झाल्याचं म्हटलं होतं.
आमिर खानची मुलगी इरा खानने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना निमित्तानं व्हिडीओ पोस्ट करत धक्कायदायक गौप्यस्फोट केला होता.
संबंधित बातम्या