Ti Aani Shala : 'ती' आणि शाळा वेब सिरीजच्या पोस्टरचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण!
Ti Aani Shala : 'ती आणि शाळा’ या वेब सिरीजचा पहिला एपिसोड अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 3 मे 2022 रोजी युट्युबच्या माध्यमातून ‘स्टुडिओ 09 प्रोडक्शन्स’ या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Ti Aani Shala : बहुचर्चित 'ती आणि शाळा’ (Ti Aani Shala ) वेब सिरीजच्या पोस्टरचे अनावरण राजकारणातील लोकप्रिय नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात करण्यात आले. या निमित्ताने या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार आहे, याचा उलगडा झाला आहे. महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनावर आणि विशेषकरून शाळकरी मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली नवोदित अभिनेत्री अनुश्री माने ही या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. तर, तिच्या जोडीला आदिनाथ जाधव हा तरुणाईचा आयकॉन ठरलेला लोकप्रिय अभिनेता पाहायला मिळणार आहे.
'ती आणि शाळा’ या वेब सिरीजचा पहिला एपिसोड अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 3 मे 2022 रोजी युट्युबच्या माध्यमातून ‘स्टुडिओ 09 प्रोडक्शन्स’ या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पोस्टरचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण!
पुण्यात नुकताच 'ती' आणि शाळा वेब सिरीजच्या पोस्टरचा अनावरण सोहळा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शाळेतल्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावुक होऊन प्रतिक्रिया दिली. शाळेतल्या आठवणींवर भाष्य करतानाच त्यांच्या शाळेतले मित्र, तेव्हाच्या गंमतीजमती त्यांनी वेब सिरीजच्या टीम सोबत शेअर केल्या.
छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, 'ती आणि शाळा हा विषय सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा असून ही वेब सिरीज अल्पावधीतच लोकप्रिय ठरेल. प्रत्येकाच्याच आयुष्यात शाळेतले दिवस अत्यंत नाजूक आणि आठवणीतले असतात. त्यावेळचे मित्र- मैत्रिणी, शाळेतले शिक्षक आणि एकूणच इतर आपल्याला अजूनही अगदी तसेच्या तसे आठवतात. त्यांची तेव्हाची प्रतिमा आपल्या नजरेसमोर कायम राहते आणि आपण कितीही मोठे झालो तरीही तेव्हाच्या त्या सर्वच व्यक्ती आपल्याला कायमच तेव्हा होत्या तशा आठवतात. या वेब सिरीजला मी मनापासून शुभेच्छा देतो.'
महाराष्ट्राच्या तरुणाईची फेव्हरेट जोडी अनुश्री आणि आदिनाथ ही शालेय गणवेशात पोस्टरवर झळकलेली पाहायला मिळत आहे. अनुश्री आणि आदिनाथ या जोडीने आपल्या विविध वेब सिरीजमधून यापूर्वीच रसिकमन जिंकल्याने त्यांच्या नव्या वेब सिरिजबाबत आता उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
काय आहे कथानक?
वेब सिरिजच्या शीर्षकावरूनच ही वेब सिरीज शाळेतल्या तिच्या भोवती फिरणारी असल्याचं समजते. शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच, त्या अजाण वयात भेटलेल्या 'ती' भोवतीची ही कहाणी आहे. पुढे शाळा संपल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे 'ती' कायम आहेच. शाळा संपल्यानंतर 'ती' त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणते यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेब सिरीज लवकरच युट्युबच्या माध्यमातून स्टुडिओ 09 या चॅनलवर प्रसिद्ध होणार आहे.
हेही वाचा :
PHOTO : ‘दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…’, रसिका सुनीलचा ‘महाराष्ट्र दिना’निमित्त खास मराठमोळा अंदाज!
युद्धपरीस्थितीतही युकेनमध्ये पोहोचली अँजेलिना जोली, लहान मुलांसह स्वयंसेवकांची घेतली भेट!