Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'वीर दौडले सात' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
![Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा Mahesh Manjrekar The greatest budget masterpiece in Marathi Mahesh Manjrekar announces upcoming movie Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/01/13c4c05d58a55f41dcc3242440ad2179_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahesh Manjrekar : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्र दिनी' त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'वीर दौडले सात' (Veer Daudale Saat) असे या सिनेमाचे नाव आहे.
'वीर दौडले सात' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत. हा सिनेमा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले आहे. तर वसिम करेशी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची गाथा सर्वत्र पोहोचणार आहे.
View this post on Instagram
महेश मांजरेकरांनी 'वीर दौडले सात' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी 2023". तसेच या सिनेमाचे पोस्टर वो सात (wo saat) असे म्हणत हिंदीतही प्रदर्शित करण्यात आले आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Angelina Jolie: अशीही एक हॉलिवूड अभिनेत्री! युद्धपरीस्थितीतही युक्रेनमध्ये पोहोचली अँजेलिना जोली, लहान मुलांसह स्वयंसेवकांची घेतली भेट!
Ti Aani Shala : 'ती' आणि शाळा वेब सिरीजच्या पोस्टरचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण!
Laal Singh Chaddha: 'लाल सिंग चड्ढा'च्या प्रमोशनचा हटके फंडा! करीना कपूर-आमिर खाननं पूर्ण केलं ‘फेदर चॅलेंज’
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)