एक्स्प्लोर
गीता फोगटच्या लग्नाला आमीरची हजेरी
चंदीगड : पैलवान गीता फोगटच्या लग्नाला अभिनेता आमीर खानने उपस्थिती लावून सोहळ्याची रंगत वाढवली. हरियाणामधील बलाली या गावात गीता फोगटचा आज विवाह पार पडला.
आगामी 'दंगल' सिनेमात आमीर गीता फोगटचे वडील पैलवान महावीर फोगट यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आमीरने सिनेमाच्या प्रमोशनचाही शुभारंभ केला.
'दंगल' सिनेमा येत्या 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गीता फोगट आणि तिच्या तीन बहिणी आणि महावीर फोगट यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
दरम्यान 'दंगल' सिनेमा हेच गीतासाठी लग्नाचं गिफ्ट आहे, असं यावेळी आमीरने सांगितलं.
नोटाबंदीचा लग्नावर परिणाम नाही : गीता फोगट
नोटाबंदीमुळे लग्नावर कसलाही परिणाम झाला नाही, असं गीताने यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान मोंदीनी घेतलेल्या या निर्णयाचं गीताने स्वागत केलं.
नोटाबंदीवर आमीरची सावध प्रतिक्रिया
नोटाबंदीमुळे आपल्याला कसलाही त्रास झाला नसल्याचं आमीरने सांगितलं. आपले सर्व पैसे बँकेत आहेत आणि व्यवहार चेकद्वारे होतात, त्यामुळे या निर्णयाने काहीही नुकसान झालं नाही, असं आमीर म्हणाला.
दरम्यान आमीरने यावर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगली. कलाकार कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी घाबरतात. कारण आम्ही एक बोलतो आणि ते वेगळ्याच पद्धतीने दाखवलं जातं, अशी खंत आमीरने व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement