एक्स्प्लोर

Aashram 4 Season : बाबा निराला येणार, 'आश्रम-4' कधी रिलीज होणार? 'भोपा स्वामी'ने दिली मोठी अपडेट

Bobby Deol Aashram 4 web Series Updates : 'काशीपूरवलाले बाबा निराला' प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

Bobby Deol Aashram 4 web Series  Updates :   अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) प्रसिद्ध वेब सीरिज 'आश्रम'  (Aashram Web Series) पुन्हा एकदा चर्चेत आहे. 'काशीपूरवलाले बाबा निराला' प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 'बाबा निराला' यांचा राईट हँड असलेल्या 'भोपा स्वामी' अर्थात चंदन रॉय सन्याल याने 'आश्रम-4' (Aashram Web Series OTT Updates) मोठी अपडेट दिली आहे.  

कधी रिलीज होणार 'आश्रम-4'?

अभिनेता चंदन रॉय सन्याल याने लाईव्ह हिंदुस्तान  या वृत्तसंकेतस्थळाला मुलाखत दिली. आपल्या मुलाखतीत चंदने आश्रम-4 बाबत म्हटले की, मी कुठेही गेलो तरी आश्रमच्या चौथ्या सीझनबद्दल विचारणा करतात. त्यामुळे  मी आश्रमच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की, आश्रमचा चौथा सीझन याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे चित्रीकरण झाले असून, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे चंदनने सांगितले.  डिसेंबर महिन्यात 'आश्रम-4' OTT वर प्रसारित होणार असल्याचे समजते. मात्र, रिलीज डेट अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती आहे. 

चंदन रॉय सन्यालने मुलाखतीत सांगितले की, आश्रम या वेब सीरिजला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेब सीरिजचा प्रभावही लोकांवर पडला. सीरिजमधले 'जपनाम' हा शब्द सामान्य लोकांपर्यंत पोहचला असल्याचे चंदनने सांगितले. ही वेब सीरिज सामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गातही लोकप्रिय ठरली.  यावेळी त्याने प्रकाश झा यांचेही कौतुक केले. 

'आश्रम-4'चा टीझर लाँच

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

‘आश्रम’च्या चौथ्या सीझनचा टीझर जून 2022  मध्ये रिलीज झाला होता. टीझर शेअर करताना बॉबी देओलने लिहिले होते की, “बाबा निराला हे अंतर्यामी आहेत, त्यांना तुमच्या मनातील गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे आश्रम 3 च्या एपिसोडसोबत आम्ही आश्रम 4 ची झलक  सादर करत असल्याचे बॉबी देओलने म्हटले होते.

आश्रम वेब सीरिजमधून बॉबी देओलने ओटीटीवर पदार्पण केले होते. बॉबी देओलची ही भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती.  प्रकाश झा यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले. सीरिजच्या पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget