Bigg Boss Marathi 6: यंदा बिग बॉसच्या घरात कोणाची राजकीय एंट्री? रितेश भाऊंचं धमाल उत्तर, व्हिडिओ व्हायरल
यंदा बिग बॉसमध्ये कुठली राजकीय एन्ट्री आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने धमाल उत्तर दिलं

Bigg Boss Marathi : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तर मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची एकच हवा आहे. बिग बॉस मराठीचा नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरात कोणते कोणते स्पर्धक असणार यावरून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. नुकतंच बिग बॉस मराठीची दार उघडत असल्याची घोषणा शोचा होस्ट रितेश देशमुख याने प्रेस कॉन्फरन्स घेत केली. शंभरहून अधिक कॅमेरे, 16 पेक्षा अधिक स्पर्धक असणाऱ्या बिग बॉसच्या घरात एखादी राजकीय एंट्री असणार का? या प्रश्नाचं रितेश देशमुखने धमाल उत्तर दिलंय. त्याच्या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. रितेशने नाव रिव्हिल केलं नसलं तरी त्याच्या उत्तराची सध्या एकच चर्चा रंगली आहे.
11 जानेवारीपासून बिग बॉस मराठीचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाचे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना रोज रात्री आठ वाजता हा शो पाहता येणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर संभाव्य स्पर्धकांची जोरदार चर्चा रंगली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात 22 ते 55 वयोगटातील स्पर्धक असणार आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर , कलाकार, गायक तसेच एखादे राजकीय एंट्री ही असू शकते असा अंदाज चाहते वर्तवत आहेत.
यंदा बिग बॉसमध्ये कोणाची राजकीय एंट्री ?
बिग बॉस शो चालू होत असल्याची घोषणा केल्यानंतर पोस्ट रितेश भाऊंना उपस्थित आणि अनेक प्रश्न विचारले. यातच यंदा बिग बॉसमध्ये कुठली राजकीय एन्ट्री आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने धमाल उत्तर दिलं , तो म्हणाला "ज्यांना पार्टीचे तिकीट मिळालं नाही त्यांना इकडे आणणार मी .. " असं रितेश म्हणाला. पुढे तो म्हणाला ," मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की घरात नेमकी कोणते स्पर्धक आहेत हे अजून मलाच माहीत नाही. पण जर राजकीय पक्षाचे तिकीट मिळालं नसेल तर त्याला इथलं मिळूही शकतं आणि नाहीही .. " यावर बिग बॉसच्या सीजन 5 मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकर म्हणाली, राजकीय पक्षाचं तिकीट मिळवण सोप्पं आहे, पण बिग बॉसचं नाही."
View this post on Instagram
या नावांची चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर संभाव्य स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत . यंदा बिग बॉसच्या नवीन सीझनसाठी चला हवा येऊ द्या फेम अभिनेता सागर कारंडे, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर अंशुमन विचारे देखील बिग बॉसच्या घरात दिसू शकतो, असं बोललं जातंय. तर काही सोशल मीडिया स्टार्सची देखील या शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.























