(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Big Boss 17 :'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीवर कोण कोरणार? काय सांगतोय वोटिंग ट्रेंड? जाणून घ्या
बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी (munawar faruqui),, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना असणार आहे. या पाच जणांपैकी एक बिग बॉसच्या 17 व्या सीझनचा विजेता ठरेल.
Big Boss 17 : बिग बॉस सिझन 17 (Big Boss 17)चा महाविजेता आज घोषित केला जाणार आहे. या सिझनच्या जेतेपदासाठी 5 स्पर्धकांमध्ये सामना रंगणार आहे. बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी (munawar faruqui),, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना असणार आहे. या पाच जणांपैकी एक बिग बॉसच्या 17 व्या सीझनचा विजेता ठरेल.
वोटिंग ट्रेंडमुळे चाहतेही हैराण (Big Boss 17)
बिग बॉसचा महाअंतिम सोहळा रविवारी (दि.28) पार पडणार आहे. कलर्स टिव्ही आणि जिओ सिनेमावर सांयकाळी 6 ते 12 या वेळेत प्रेक्षकांना हा सोहळा पाहाता येणार आहे. मुनव्वर फारुकी, मन्नार चोप्रा, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांपैकी कोण 17 व्या सिझनचा विजेता ठरणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर याबाबत वोटिंग ट्रेंडमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चाहते ही हैराण झाले आहेत.
मुन्नवर फारुकी सध्या पहिल्या क्रमांकावर (Big Boss 17)
सोशल मीडियावरिल ट्रेंडनुसार, सुरुवातीच्या वोटिंग ट्रेंडमध्ये मुनव्वर फारुकीला विजेता होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर अभिषेक कुमार या ट्रेंडमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर मन्नारा चोप्रा पाहायला मिळत आहे. मात्र, चोप्राला मागे टाकत अंकिता लोखंडे तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर अरुण महाशेट्टी हा वोटिंग ट्रेंडमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
View this post on Instagram
अजय देवगणची असणार उपस्थिती (Big Boss 17)
बिग बॉसच्या सिझन 17 चा महाअंतिम सोहळा आज सर्वांना पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी अभिनेता अजय देवगण आणि इतर काही सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या सिझन 17 अंतिम दिवशी कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या