एक्स्प्लोर

Bigg Boss 17 Finale : राहुल रॉय, श्वेता तिवारी ते एमसी स्टॅन; बिग बॉसचा खिताब आजवर कोणी कोणी जिंकलाय?

Big Boss 17 : अभिनेता सलमान खानचा रिआलिटी शो 'बिग बॉस 17' चा विजेता आज घोषित होणार आहे. काही तासांत बिग बॉसला नवा विजेता मिळेल. बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना असणार आहे

Big Boss : अभिनेता सलमान खानचा रिआलिटी शो 'बिग बॉस 17' चा विजेता आज घोषित होणार आहे. काही तासांत बिग बॉसला नवा विजेता मिळेल. बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना असणार आहे. या पाच जणांपैकी एक बिग बॉसच्या 17 व्या सीझनचा विजेता ठरेल. मात्र, यापूर्वीच्या 16 सिझनमध्ये कोणी कोणी बिग बॉसचा खिताब पटकावलाय जाणून घेऊयात...

बिग-बॉस सिझन 1 - राहुल रॉय

अभिनेता आणि मॉडेल राहुल रॉय याने 2007 मध्ये बिग बॉसचा पहिला सीझन जिंकला होता. राहुल रॉयने 90 च्या दशकातील आशिकी, जुनून आणि गुमराह यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. बिग बॉसचा पहिला सिझन जिंकत त्याने 1 कोटी रुपये जिंकले होते. हा सिझन अर्शद वारसीने होस्ट केला होता. 

आशितोष कौशिक- बिग बॉस सीजन 2

आशुतोष कौशिक बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता.  हा सिझन 2008 मध्ये पार पडला होता. दुसऱ्या सिझनमध्ये राजा चौधरी उपविजेता ठरला होता. शिल्पा शेट्टीने हा सिझन होस्ट केला होता. दुसऱ्या सिझनच्या विजेत्यालाही 1 कोटी रुपये देण्यात आले होते. 

विंदू दारा सिंह- बिग बॉस सीजन 3

मुझसे शादी करोगी', 'पार्टनर', 'कमबख्त इश्क' आणि 'हाउसफुल'मध्ये महत्वाच्या भूमिका साकारणाऱ्या विंदू दारा सिंहने बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये खिताब आपल्या नावावर केला होता. 2009 मधील या सिझनला महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले होते. 

बिग बॉस सीजन 4 - श्वेता तिवारी 

अनेक टिव्ही मालिकांच्या माध्यमातून श्वेता तिवारी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. श्वेता तिवारीने दिलीप सिंह राणाचा पराभव करत बिग बॉसच्या चौथ्या सिझनचा खिताब जिंकला होता. चौथा सिझनच्या विजेत्यालाही 1 कोटी रुपये देण्यात आले होते. 

बिग बॉस सीझन ५- जूही परमार 

रिआलिटी शो आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या जूह परमारने बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये कमाल केली होती. तिने 5 व्या सिझनचा खिताब जिंकला होता. 

बिग बॉस सीझन 6 - उर्वशी ढोकलिया 

अभिनेत्री उर्वशी ढोकलिया बिग बॉसच्या सहाव्या सिझनची विजेता ठरली होती. इमाम सिद्दीकी तिने सहाव्या सिझनमध्ये पराभव केला होता. ६ व्या सिझनच्या विजेत्यालाही 1 कोटी रुपये देण्यात आले होते. बिग बॉसचा खिताब जिंकल्यानंतर उर्वशी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 

बिग बॉस सीझन 7 - गौहर खान 

अभिनेत्री गौहर खान बिग बॉसच्या 7 व्या सिझनची विजेता ठरली होती. इशकजादे या सिनेमात तिने महत्वाची भूमिका बजावली होती. 7 व्या सिझनमध्ये तनिषा मुखर्जी उपविजेती ठरली होती. गौहर खानने अनेक वेब सिरीजमध्येही काम केले आहे. 

बिग बॉस सीझन 8 - गौतम गुलाटी 

'दीया और बाती हम' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या गौतम गुलाटीने बिग बॉसचा 8 वा सिझन जिंकला होता. या सिझनमध्ये गौतमचे अनेकांनी कौतुक देखील केले होते. सलमान खानच्या राधे या सिनेमात देखील त्याने काम केले आहे. 

बिग बॉस सीझन 9 - प्रिंस नरुला

रिआलिटी शोजचा राजा अशी प्रिंस नरुलाची ओळख आहे. तो बिग बॉस सिझन 9 चा विजेता ठरला होता. 2022 मधील लॉक अप या रिआलिटी शोमध्ये त्याची विशेष उपस्थिती होती. 

बिग बॉस सीझन  10 - मनवीर गुर्जर 

मनवीर गुर्जर हा बिग बॉसच्या 10 व्या सिझनचा विजेता ठरला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. शिवाय बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतरही त्याने शेती करण्यास पसंती दिली होती. 

बिग बॉस सीझन 11 - शिल्पा शिंदे 

शिल्पा शिंदे हिने बिग बॉसच्या 11 व्या सिझनमध्ये कमाल केली होती. शिल्पा बिग बॉसच्या 11 व्या सिझनची विजेती ठरली होती. विकास गुप्ता आणि पुनिश शर्मा यांना पराभूत करत तिने या सिझनमध्ये विजय मिळवला. 

बिग बॉस सीझन 12- दीपिका कक्कड 

दीपिका कक्कड टेलिव्हिजनमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. दीपिका बिग बॉसच्या 12 व्या सिझनची विजेती ठरली होती. तिने एस श्रीशांत आणि रोहिल चौधरी यांचा पराभूत करत तिने हा खिताब जिंकला होता. 

बिग बॉस सीझन 13 - सिद्धार्थ शुक्ला

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने बिग बॉसचा सिझन जिंकल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळवली होती. तो बिग बॉसच्या 13 व्या सिझनचा विजेता ठरला होता. 

बिग बॉस सीझन 14 - रुबीना दिलेक

रुबीना दिलेक ही बिग बॉसच्या 14 व्या सिझनची विजेता ठरली होती. तिची या सिझनमधील कामगिरी कौतुकास पात्र ठरली होती. प्रेक्षकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. राहुल वैद्यला पराभूत करत तिने हा खिताब पटकावला होता. 

बिग बॉस सीझन 15 - तेजस्वी प्रकाश 

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने बिग बॉसचा 15 वा सिझन जिंकला होता. प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा यांना पराभूत करत तिने हा खिताब जिंकला होता.  

एमसी स्टैन - बिग बॉस सिझन 16

एमसी स्टैन बिग बॉस सिझन 16 चा विजेता ठरला होता. त्याने शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी यांना पराभूत करत हा सिझन जिंकला होता. यानंतर त्याने संपूर्ण भारताचा दौरा केला होता. अनेक हिट गाणेही बनवले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Filmfare Awards 2024: 'सॅम बहादुर' आणि 'अॅनिमल' चा डंका तर शाहरुखचा 'जवान' ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट; जाणून घ्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची नावं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Embed widget