(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अक्षय कुमारने घोषणा केलेल्या FAU-G गेमवर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
PUBG गेम बॅन झाल्यानंतर त्याच्या जागी आता भारतीय FAU-G गेम येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने ट्वीट करून दिली. अशातच आता फौजी गेमवर सोशल मीडियावर मीम्स शेअर केले जात आहेत.
मुंबई : तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला PUBG गेम बंद केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एक नवा भारतीय गेमिंग अॅप लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा 20% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे. परंतु, गेमर्सनी आता यावर मीम्स तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अॅक्शन गेमचं नाव फिअरलेस अॅन्ड यूनायटेड गार्ड्स असं असणार आहे. तसेच हा गेम पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला सपोर्टही करणार आहे. जसं अक्षय कुमारने या गेमबाबत घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पबजी बॅन केल्यानंतर फक्त दोन दिवसांच्या कालावधीतच हा गेम कसा तयार करण्यात आला, यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
अशातच आता सोशल मीडियावर या गेमसंदर्भात मीम्सचा महापूर आला आहे.
काय आहे अक्षयचं ट्वीट?'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी 20% निधी जवानांना देण्यात येणार आहे' असे अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे.Supporting PM @narendramodi’s AtmaNirbhar movement, proud to present an action game,Fearless And United-Guards FAU-G. Besides entertainment, players will also learn about the sacrifices of our soldiers. 20% of the net revenue generated will be donated to @BharatKeVeer Trust #FAUG pic.twitter.com/Q1HLFB5hPt
— Akshay Kumar (@akshaykumar) September 4, 2020
Hey Guys I am working on a new Game ❤️ will release it tomorrow 👍#FAUG pic.twitter.com/OcfzmkFXLy
— Sanskari Guitarist (@Jellyacoustic) September 4, 2020
Since 2008 pic.twitter.com/wfhWyjYbdl
— 🆎 (@Woh_ladka) September 4, 2020
working on a new game pic.twitter.com/vJZaRUgYBt
— Akshar (@AksharPathak) September 4, 2020
Okay let's do this. My contribution to this meme Thread #FAUG pic.twitter.com/DCuC253P1C
— Kaafi_Weird Choraa (@Kaafi_weird) September 4, 2020
#AkshayKumar Launching #FAUG pic.twitter.com/5FkS8prvgX
— Tonishark (@Tonishark3) September 4, 2020
Akshay Kumar to all the PUBG player now- #FAUG pic.twitter.com/0Xje1rvzkM
— Mannat (@thandrakhleyar) September 4, 2020
118 चीनी अॅप्सवर बंदी केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे, यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे.Series of event. #FAUG #Akshaykumar #PUBG pic.twitter.com/v9UIrV5Mpb
— Risssshabh👶 (@Sarcasmiclol) September 4, 2020