Aryan Khan Cruise Drugs Case : आर्यन खानची आज NCB कार्यालयात हजेरी, हातातील पुस्तक पाहून अनेकांना प्रश्न
शाहरुख खानच्या बॉडीगार्डसह आर्यन (Aryan Khan) एनसीबी (NCB) कार्यालयात दाखल झाला. दरम्यान आर्यनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aryan Khan Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामिनावर सुटलेला आर्यन खान आज एनसीबीच्या कार्यालयात पोहोचला. जमीन देताना कोर्टानं घातलेल्या अटींनुसार आर्यनला एनसीबी कार्यालयात हजर व्हावं लागलं आहे. शाहरुख खानच्या बॉडीगार्डसह आर्यन एनसीबी कार्यालयात दाखल झाला. दरम्यान आर्यनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एनसीबी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी आर्यनच्या हातात एक पुस्तक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'The Girl With The Dragon Tattoo' पुस्तक आर्यनकडे आहे. हे सायकोलॉजिकल थ्रिलर पुस्तक आहे.
हे पुस्तक स्विडीश लेखक स्टीग लॅरसन (Stieg Larsson) यांनी लिहिले आहे. या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील आहे. या चित्रपटात जेम्स बॉन्ड (James Bond), डेनियल क्रेग (Daniel Craig) आणि रुनी मारा (Roonie Mara) यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाल ऑस्कर आणि इतर पुरस्कार देखील मिळाले .
आर्यन खान जरी फिल्मी दुनियापासून दूर असला तरी त्याचे चित्रपटाविषयीचे ज्ञान आणि कौशल शाहरुखपेक्षा कमी नाही. शाहरुखच्या येणाऱ्या पठाण चित्रपटासाठी देखील आर्यनने अनेक नव्या गोष्टी सुचवत असतो.
आर्यनशिवाय ड्रग्ज केसमधील अरबाज मर्चंटने देखील एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणी आर्यनला अटक करण्यात आली होती. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात 22 दिवस घालवल्यानंतर आर्यनला 30 ऑक्टोबरला जामीन मिळाला. दरम्यान, आर्यन खानला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयानं 14 अटी घातल्या आहेत. ज्यांचं पालन आर्यनला करावं लागणार आहे. जर अटींचं पालन आर्यननं केलं नाही तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो.
... या 14 अटी
1. आर्यन खानला एक लाख रुपयांचा पर्सनल बाँड भरावा लागणार आहे.
2. अशाप्रकारच्या कोणत्याही प्रकरणात पुन्हा सहभागी न होण्याची हमी आर्यनला द्यावी लागणार
3. या प्रकरणातील कोणत्याही आरोपींसोबत संपर्क साधायचा नाही.
4. असं कोणतंही काम करु नये, ज्यामुळं त्यांच्यावरील आरोपांवर फरक पडेल.
5. साक्षीदार किंवा पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये
6. पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश
7. माध्यमांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यास मनाई
8. उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई
9. आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक
10. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार
11. कोर्टाच्या प्रत्येक सुनावणी वेळी उपस्थित राहावं लागणार आणि तपासात पूर्ण सहकार्य करणं गरजेचं
12. प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर चौकशीला विलंब करु नये
13. अर्जदार/आरोपींना न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावं लागणार
14. आरोपीनं यापैकी कोणत्याही अटींचं उल्लंघन केलं तर मात्र जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी विशेष कोर्टात अर्ज करु शकते