Trans Actress India : लिंग बदलून मुलगी झाली, सुपरस्टारसोबत सिनेसृष्टीत पदार्पण, आज आहे मोठी अभिनेत्री
Trans Actress India : एका अभिनेत्रीचा प्रवासही स्वप्नवत असा आहे. लिंग बदल करून मुलगी झालेली ट्रान्स अॅक्ट्रेसने सध्या मल्याळम सिनेसृष्टी गाजवली आहे.
Trans Actress India : अनेकजण आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असतात. काहीजणांना स्वत:वर खूप विश्वास असतो. त्यातूनच त्यांच्याकडून स्वप्नांचा पाठलाग सुरू असतो. एका अभिनेत्रीचा प्रवासही स्वप्नवत असा आहे. लिंग बदल करून मुलगी झालेली ट्रान्स अॅक्ट्रेसने (Transgender Actress) सध्या मल्याळम सिनेसृष्टी गाजवली आहे. अंजली अमीर (Anjali Ameer) असे या मल्ल्याळम अभिनेत्रीचे नाव आहे. मोठ्या संघर्षानंतर अंजलीने इंडस्ट्रीत नाव आणि वलय मिळवले आहे.
अंजली अमीर ही एक मुलगा म्हणून जन्माला आलेली. मात्र, वयात येत असताना पुरुषाच्या शरीरात एक स्त्री असल्याचे तिला जाणवले. ही बाब स्वीकारल्यानंतर तिने स्वत:लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सध्या अंजली मल्याळम इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाली आहे. अंजलीचा जन्म 1995 मध्ये केरळमधील कोझिकोड येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला आणि तिचे बालपण गरिबीशी झुंजत गेले. लहानपणी जन्मलेल्या अंजलीने या काळात अनेक लहानमोठ्या नोकऱ्या केल्या आणि वयाच्या 10 व्या वर्षी घर सोडलं.
मॉडेलिंग करून शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवले
अंजलीला नेहमी आतून वाटत होतं की ती मुलगी आहे, मुलगा नाही आणि मग तिने आयुष्य एक मुलगी म्हणून जगायचं ठरवलं होतं. यानंतर अंजलीने लिंग बदलण्याचा विचार केला. यासाठी त्याला खूप पैशांची गरज होती, त्यामुळे त्याने मॉडेलिंग सुरू केले. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेपूर्वी अंजली अमीरला जमशीर या नावाने ओळखले जात होते.
अंजली अमीरने वयाच्या 20 व्या वर्षी लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला. अंजली ही चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी पहिली ट्रान्सवुमन आहे.
सुपरस्टार मामुटीसोबत रुपेरी पडद्यावर पदार्पण
अंजली अमीरने 2018 मध्ये 'पेरांबू' चित्रपटातून पदार्पण केले. अंजली अमीरने तिच्या पहिल्या चित्रपटात सुपरस्टार मामुटीसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने त्याच्या पत्नीची भूमिका केली होती आणि हा चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला होता. 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 7.2 कोटींची कमाई केली होती. अंजली अमीरला 'बिग बॉस मल्याळम'मधून खूप प्रसिद्धी मिळाली आणि ती प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाली. 'पेरांबू', 'अम्मू' आणि 'सुवर्ण पुरुष' यांसारख्या चित्रपटांमध्ये अंजलीने आपली छाप सोडली आहे. आज ती मल्याळम इंडस्ट्रीची खूप प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.
View this post on Instagram
आयुष्यात अनेक आव्हाने
अंजली अमीरला आता यश मिळाले असले तरी सुरुवातीला तिचे आयुष्य खूप कठीण होते. तिने तिची खरी ओळख घरातल्या कुणालाही उघड होऊ दिली नाही. एकदा ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, अंजली अमीरने सांगितले की, लोक तिच्या स्त्रीत्वाला एक समस्या मानतात आणि तिला हार्मोन उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आजूबाजूचे लोक त्याला खूप काही बोलत असे आणि त्रास देत. एका पुराणमतवादी मुस्लिम कुटुंबात जमशीरच्या रूपात जन्मलेल्या अंजली आमीरने अत्याचार आणि अनेक दादागिरी सहन केली, परंतु तिने या सर्व आव्हानांवर मात करून यश मिळवले.