एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

अभिनेता किशोर दासचे निधन

आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे निधन झालं आहे. किशोर दासनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. चैन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी किशोरनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन किशोरनं त्याला जाणवत असलेल्या समस्यांबाबत सांगितलं होतं.

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार संत कान्होपात्रा!

'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे.

'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी' नंतर आता 'स्टेपनी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विनोदाचा बादशहा भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे.

राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर शंभरी

एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकतेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमाने फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली नसून संपूर्ण जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस 'आरआरआर' सिनेमा उतरत आहे.

धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट झाला आहे. धनुषने टीझर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

23:30 PM (IST)  •  04 Jul 2022

'देवमाणूस 2' मालिकेत नवा ट्विस्ट; जामकरच्या पत्नीची होणार एन्ट्री

Snehal Shidam : 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. जामकर आणि देवयानीच्या एन्ट्रीनंतर ही मालिका विलक्षण वळणावर आली आहे. जामकरने अजितकुमारला पुरता अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणारा सर्व तपास जामकर करतो आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. जामकरच्या पत्नीची आता मालिकेत एन्ट्री होणार आहे. 

18:04 PM (IST)  •  04 Jul 2022

RRR : 'Every thing Every Where All At Once' यंदाचा पुरस्कार राजमौलींच्या 'आरआरआर'ला; हॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे

RRR Beats Hollywood Films : एस.एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) सिनेमा दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड करत आहे. या सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. जगभरात या सिनेमाने 1115 कोटींची कमाई केली आहे. आता या सिनेमाने हॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे. 

RRR : 'Every thing Every Where All At Once' यंदाचा पुरस्कार राजमौलींच्या 'आरआरआर'ला; हॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे

16:39 PM (IST)  •  04 Jul 2022

Jhalak Dikhhla Jaa 10 : करण जोहरसोबत परीक्षण करणार धक-धक गर्ल

Karan Johar JUdge Jhalak Dikhhla Jaa : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाच्या दहाव्या सीझनला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर होता. या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. या कार्यक्रमाचे परिक्षण वेगवेगळे सेलिब्रिटी करत असतात. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सांभाळणार आहे. काजोलने या कार्यक्रमाची ऑफर धुडकावली आहे. 

16:03 PM (IST)  •  04 Jul 2022

अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रनवे 34' (Runway 34) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहे. अजयचा आगामी 'भोला' (Bholaa) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॅथी' (Kaithi) या दाक्षिणात्य सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अजय भोला हे पात्र साकारण्यासोबतच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

15:59 PM (IST)  •  04 Jul 2022

'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

पाहा गाणं:

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget