एक्स्प्लोर

Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!

Phone Bhoot Release Date: बॉलिवूड स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif), ईशान खट्टर (Ishan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)  यांचा आगामी चित्रपट 'फोन भूत'ची (Phone Bhoot) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Phone Bhoot Release Date: बॉलिवूड स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif), ईशान खट्टर (Ishan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)  यांचा आगामी चित्रपट 'फोन भूत' (Phone Bhoot) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच याचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले होते. 15 जुलैला दुपारी निर्मात्यांनी  या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करताना देखील ही रिलीज डेट 7 ऑक्टोबरचं होती. मात्र, संध्याकाळच्या शेवटी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता निर्मात्यांनी या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.

आता हा चित्रपट 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ व्यतिरिक्त ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या शेजारी बसलेली आहे. तसेच, त्यांच्यासमोर जादूटोणा साहित्य ठेवलेले दिसत आहे. चित्रपटाचे हे पोस्टर शेअर करताना ईशान खट्टरने लिहिले की, 'भूतबद्दल महत्त्वाचे अपडेट. फोन भूत आता 4 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन रविशंकर आणि जसविंदर सिंह बाथ यांनी केले आहे.

पाहा पोस्टर :

या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची कथा एका दुकानाभोवती विणली गेली आहे, जिथे भूत-प्रेत यांना कैद करण्याचे सामना विकले जाते. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मोशन पोस्टरच्या सुरुवातीला इशान खट्टर खांद्यावर सांगाडा घेऊन दिसत आहे. यानंतर सिद्धांत आणि कतरिना देखील ईशान खट्टरसोबत बसलेले दिसत आहेत. ब्लॅक आउटफिटमध्ये कतरिना एखाद्या तांत्रिकाप्रमाणे भासत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

हेही वाचा :

Katrina Kaif ,Vicky Kaushal Photos : विकी कतरिना स्पेंड करतायत 'क्वालिटी टाईम'; शेअर केले खास फोटो

katrina kaif, Vicky Kaushal : कतरिनाचा एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'प्रेग्नंट आहेस का?'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget