Amol Kolhe : डॉ अमोल कोल्हे यांचा 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.
Amol Kolhe : राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी , स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहात आहेत.
बॉलिवुड चित्रपट चॉक अँड डस्टर , नटसम्राट या चित्रपटाचा गुजराती रिमेक, गुजरात 11 तसेच सुपरहिट चित्रपट हल्की फुलकी इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर यांनी केले आहे रणभूमी या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर एकत्र काम करत आहेत.
जयंत गिलाटर यांच्या मते 'विठ्ठल विठ्ठला' हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
'विठ्ठल विठ्ठला' ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत , चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे. अमोल कोल्हे यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या
- Sonu Nigam On The Kashmir Files : 'म्हणून मी अजूनही द कश्मीर फाइल्स नाही पाहिला...'; सोनू निगमनं सांगितलं कारण
- katrina kaif, Vicky Kaushal : कतरिनाचा एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'प्रेग्नंट आहेस का?'
- kgf chapter 2 : केजीएफ-2 च्या दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट; म्हणाला, 'गोष्टी लिहिताना मी दारू पितो'
- Santosh Juvekar : 'लोकांना वाटत गॉगल घातला असेल तरच तो अभिनेता नाहीतर...'; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha