एक्स्प्लोर

 Tunisha Sharma : अभिनेत्री टुनिशा शर्माने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन संपवलं जीवन

Tunisha Sharma : मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन अभिनेत्री टुनिशाने शर्माने जीवन संपवलंय.

Tunisha Sharma : अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय.  नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी टुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी टुनिशाने शेअर केली होती.   

टुनिशा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. घटनेनंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टुनिशाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

Tunisha Sharma : कोण आहे टुनिशा शर्मा? 

20 वर्षीय टुनिशा शर्मा ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री होती. ती टीव्ही मालिका "इश्क सुभान अल्लाह" मध्ये झारा/बबली आणि "इंटरनेट वाला लव" मध्ये आध्या वर्माच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होती. 

टुनिशा शर्माचा जन्म 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या 14 व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत  तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पूंछवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.

27 ऑगस्ट 2018 ते 29 मार्च 2019 पर्यंत तिने कलर्स टीव्ही शो इंटरनेट वाला लव्हमध्ये अध्या वर्माची भूमिका साकारली होती. टेलिव्हिजनशिवाय टुनिशा चित्रपटांमध्येही सक्रिय होती. तिने फितूर, बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंह आणि दबंग 3 सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टुनिशाने पाच वर्षापूर्वी आलेल्या 'फितूर' चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती. अवघ्या कमी वयात इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या टुनिशाने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Embed widget