Akshay Kumar : अक्षय कुमारनं मुंबईत घेतलं नवं घर; खिलाडीच्या या घराची किंमत माहितेय?
रिपोर्टनुसार, सूर्यवंशी हा चित्रपट हिट ठरल्यानंतर अक्षयने मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे.
Akshay Kumar Buys New Apartment : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या स्टाईलने आणि अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. अक्षयचा काही दिवसांपूर्वी सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रिपोर्टनुसार, सूर्यवंशी हा चित्रपट हिट ठरल्यानंतर अक्षयने मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे.
अक्षयनं मुंबईमध्ये खार वेस्ट या भागात आलिशान घर विकत घेतलं आहे. रिपोर्टनुसार त्याच्या या नव्या घराची किंमत 7.8 कोटी रूपये आहे. अक्षयचं हे नवं घर खार वेस्टमधील जॉय लिजेंड बिल्डींगमध्ये 19 व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटसोबतच अक्षयला चार गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग स्पेस देखील देण्यात आली आहे. अक्षयने डिसेंबर 2021 मध्ये त्याचे अंधेरी वेस्टमधील घर 9 कोटीला विकले होते.सध्या अक्षय त्याच्या कुटुंबासोबत जुहू येथील डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहात आहे.
View this post on Instagram
2021 मध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतलं कोट्यवधींचं घर
आयुष्मानप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नवे घर घेतलं आहे. जाह्नवी कपूर, ऋतिक रोशन, अजय देवगन ,अमिताभ बच्चन या कलाकारांनी 2021 मध्ये घर घेतलं. जाह्नवी कपूरने मुंबईमधील जुहू येथे आलिशान घर घेतलं आहे. एका रिपोर्टनुसार, जाह्नवीच्या या नव्या घराची किंमत 39 कोटी आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले आहेत. या पेंट हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे. तर अजय देवगन यांनी जुहूमध्ये घर घेतले आहे. या घराची किंमत 60 कोटी रूपये आहे.
संबंधित बातम्या