एक्स्प्लोर

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'चा टीझर करतोय धमाल; निर्मिती सावंत-प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या सिनेमात सासूच्या भूमिकेत निर्मिती सावंत आणि सुनबाईच्या भूमिकेत प्रार्थना बेहरे झळकणार आहे.

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Movie Teaser: झी स्टुडिओज (Zee Studios) आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' (Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरनं या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे, ही जोडी नेमकी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टिमनं मुंबईतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले. 

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार असून, सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभवसंपन्न सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रिया यांच्यातील नात्याचं गोड–तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं की, "प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते", परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे..."

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, "प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर विचार करायला लावणारा आशय देण्यावर आमचा भर असतो. 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट हसवेलही आणि नात्यांकडे पाहाण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही देईल."

झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल म्हणतात, "आज स्त्रियांचं नातं केवळ संघर्षाचं नाही, तर एकमेकांना आधार देणारंही आहे. एका स्त्रीच्या पाठीशी दुसरी स्त्री उभी राहिल्यास काय बदल घडू शकतो, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे."

कधी हसवणारी तर कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू सुनेच्या नात्यातील बंध उलगडणारी ही कथा, दोन पिढ्यातील स्त्रियांच्या नातेसंबंधाचं सामर्थ्य अधोरेखित करते. टीझर पाहून एक गोष्ट मात्र नक्की, 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट सासू–सुनेच्या नात्याची एक नवी, ताजीतवानी आणि विचारप्रवर्तक ओळख देणारा आहे. 

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित 'अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केलं आहे. येत्या 16 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Chandrapur Farmer: कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Embed widget