एक्स्प्लोर

कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली.. कंगना तडकली

कंगनाने नेपोटिझम, आऊटसायडर्स यावर चर्चा केलीच. पण ती करत असताना तिने बोलता बोलता अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांचाही उल्लेख केला.

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड ढवळून निघालं आहे. तो गेल्यापासून या इंडस्ट्रीत असलेला नेपोटिझम चर्चेत आला. त्यानिमित्ताने आऊटसायडर्सना मिळणारी वागणूक आणि त्यांची होणारी पिळवणूक यांना वाचा फुटली. यात मोलाची भूमिका बजावली आहे कंगना रनोटने. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून दोन व्हिडिओ पोस्ट करत या इंडस्ट्रीत कसा नेपोटिझम आहे. सुशांतला आत्महत्येला कसं प्रवृत्त केलं गेलं. सलमान खान, जावेद अख्तर यांचे संदर्भ देऊन बळी तो कान पिळी कसं सुरू आहे याची माहिती कंगनाने दिली. पण आता प्रकरण त्याही पुढे केलं आहे.

एका इंग्रजी वाहिनीला मुलाखत देताना कंगनाने नेपोटिझम, आऊटसायडर्स यावर चर्चा केलीच. पण ती करत असताना तिने बोलता बोलता अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांचाही उल्लेख केला. तो सहज केला असता तर ठीक आहे. पण तसं झालं नाही. तो करत असतानाच या दोन अभिनेत्री दुय्यम दर्जाच्या असून 'गरजू आऊटसायडर्स' असल्याची टिप्पणी तिने केली. या मुलाखतीनंतर काही दिवस शांततेत गेले. कंगनाच्या टिप्पणीनंतर तापसी, स्वरा व्यक्त होतील असं वाटत होतं. पण तापसी शांत होती. तोवर सगळं आलबेल होतं.

सोमवारी तापसी कशी चांगली आभिनेत्री आहे. तिने कसे सिनेमे केले आणि ते कसे हिट झाले याचा दाखला एका प्रसिद्ध पत्रकाराने ट्विटरवर दिला. तिच्या चित्रपटांनी कशी तीनशे कोटींची कमाई केली तेही यात लिहिलं गेलं. याला रिट्वीट करताना तापसीने लिहिलं, कदाचित म्हणून मी बी ग्रेड अभिनेत्री असेन. ही टिप्पणी करताना तिने कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. पण ही कमेंट वाचून कंगना रनौतची  डिजिटल टीम खवळली. त्यानंतर वाद पेटला. मग हा वाद कुणी किती हिट दिले यावर गेला. तापसीचे सिनेमे कसे सोलो नव्हते. हे सांगितलं गेलं. यावर तापसीनेही आपली मतं मांडली.

मग या वादात स्वराही उतरली. आपण गरजू आऊडसाडर आहोत हे सांगतानाच मी विवेकी चर्चेची गरजू आहे. तार्किक वादाची गरजू आहे. असं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय, कंगनाने या मुलाखतीत आपल्यामुळेच कसा क्लासिक एरा सुरू झाला हे सांगितलं. यावरही स्वराने टिप्पणी केली. पथेर पांचाली हा सिनेमा आला तेव्हा कंगना त्या जमान्यात होती असं सांगत कंगनाला टोला लगावला. यावर कंगनाच्या टीमनेही क्वीनचा संदर्भ देत यापूर्वी बॉलिवूड कसं माफीयांच्या जाळ्यात होतं याचा दाखला दिला.

हा वाद सुरू असतानाच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही या वादात उतरली. अर्थात तिने कंगनाला काहीच बोल लावले नाहीत. तिने यावेळी तापसी पन्नूची पाठ थोपटली आहे. तापसी ज्या समंजस वृत्तीने बोलते.. त्याचं मला कौतुक वाटतं असं सोनाक्षी म्हणते. आता यावर कंगनाची डिजिटल टीम काहीच व्यक्त होत नाहीय. अर्थात सोनाक्षीचा संदर्भ आला तर तिथे नेपोटिझम येणार हे उघड आहे. आता हा वाद कुठे जातो ते पाहावे लागेल.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget