एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनेत्री सिमी गरेवाल म्हणतात, माझंही करिअर खराब करण्याचा प्रयत्न, पण कंगनासारखी हिंमत नव्हती!
अभिनेत्री कंगना रानौत आपल्या बेधडक व्यक्त होण्याच्या शैलीमुळं नेहमी चर्चेत असते. नुकतंच सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तिनं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता कंगनाच्या समर्थनार्थ अभिनेत्री सिमी गरेवाल देखील उतरल्या आहेत.
मुंबई: अभिनेत्री कंगना रानौत आपल्या बेधडक व्यक्त होण्याच्या शैलीमुळं नेहमी चर्चेत असते. नुकतंच सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तिनं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता कंगणाच्या समर्थनार्थ अभिनेत्री सिमी गरेवाल देखील उतरल्या आहे.
सिमी गरेवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मला कंगनाचा बोल्ड अंदाज आवडतो. माझं करिअर एका 'पॉवरफुल' व्यक्तिनं उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मी गप्प बसले, कारण मी कंगणाइतकी साहसी, बहादूर नव्हते, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मला हे आठवून भीती वाटत आहे की, सुशांत सिंह राजपूत सोबत काय-काय घडलं असेल. आणि असे किती आउटसाइडर्स बॉलिवूडमध्ये असतील. ही व्यवस्था बदलणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
ज्यावेळी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड (George Floyd)ची हत्या झाली, त्यावेळी तिथं किती जागृती करण्यात आली. तसंच कदाचित सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याआधी देखील सिमी गरेवाल कंगनाच्या समर्थनार्थ उतरल्या होत्या. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर; कंगना रानौतचा बॉलिवूडवर गंभीर आरोप सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना रानौतने सुशांतच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना बॉलिवूडवर निशाणा साधला होता. सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय असा गंभीर आरोप कंगनाने बॉलिवूडवर केला आहे. काही जण सुशांत कमकुवत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, तो मानसिकदृष्ट्या कमकुवत कसा असू शकतो? आत्महत्येआधी सुशांतची जी परिस्थिती होती, त्यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे. सुशांतवर बोट दाखवणाऱ्या सर्वांचाच कंगनाने चांगलाच समाचार घेतला होता. सुशांतने अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये म्हटलं होतं की, इंडस्ट्री मला स्वीकारत नाहीये. माझा कुणी गॉडफादर नाही, माझे सिनेमा बघा, नाहीतर मी या इंडिस्ट्रीतून बाहेर फेकला जाईन. सुशांतने अनेक चांगले सिनेमे केले होते. सुशांतच्या पहिल्या सिनेमाला (काय पो पे) फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी एवढं महत्त्व नाही दिलं. त्यानंतर 'एमस धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे' या सिनेमातील सुशांतच्या कामाबद्दल त्याचं एवढं कौतुक झालं नाही, जेवढं व्हायला हवं होतं. एवढे चांगले सिनेमे करुन देखील त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. दुसरीकडे 'गली बॉय'सारख्या फालतू सिनेमाला एवढे पुरस्कार मिळाले, असं कंगणा म्हणाली होती.I applaud #KanganaRanaut who is braver & bolder than I am. ????????Only I know how a 'powerful' person has viciously tried to destroy my career. I stayed silent. Because I am not so brave... ????@KanganaOffical
— Simi Garewal (@Simi_Garewal) July 18, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement