(Source: Poll of Polls)
Adar poonawala-Dharma Productions: करण जौहरसाठी 'दोस्ताना' खऱ्या अर्थाने उपयोगी ठरला! अदर पुनावालांसोबत कसा केला 1000 कोटींचा करार?
Adar poonawala-Dharma Productions: अदर पुनावाला यांनी धर्मा प्रोडक्शनसोबत नुकताच कोट्यवधी रुपयांचा करार केला आहे.
Adar poonawala-Dharma Productions: करण जोहरला (Karan Johar) दोस्ताना हा खऱ्या अर्थाने उपयोगी पडला आहे. करण जोहरच्या वडिलांनी दोस्ताना हा सिनेमा बनवला होता. पण करण जोहरच्या खऱ्या आयुष्यातील 'दोस्ताना'ने त्याच्या कठीण काळात त्याला मोठी मदत केली आहे. करण जोरहचे धर्म प्रोडक्शनमध्ये मागील काही काळापासून आर्थिक अडचणी असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शनचा एक मोठा भाग विकण्याचा विचार करण जोहर करत होता.
अशा परिस्थितीत करण जोहरची जवळची मैत्रीण नताशा पूनावाला आणि तिचा पती अदर पूनावाला यांनी त्याला मदतीचा हात पुढे केला आहे.प्रसिद्ध उद्योगपती अदर पूनावाला यांच्या सिरीन प्रॉडक्शनने धर्मा प्रॉडक्शनचा 50 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. म्हणजेच आता धर्मा प्रॉडक्शन आणि सिरीन प्रॉडक्शन मिळून वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट बनवणार आहेत.
या कराराची किंमत किती आहे?
हे लक्षात घेण्यासारखे आहे की धर्मा प्रॉडक्शनसाठी अदार पूनावाला यांच्या सिरीन प्रॉडक्शनच्या कंपनीने केलेल्या मूल्यांकनानुसार, सध्या धर्मा प्रॉडक्शनची एकूण किंमत 2000 कोटी रुपये आहे. या किंमतीनुसार प्रॉडक्शनने धर्मा प्रॉडक्शनमधील 50% भाग सुमारे 1000 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
करण जोहर गुंतवणूकदारांच्या शोधात होता
रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 23 मध्ये, धर्मा प्रॉडक्शनने 1044 कोटी रुपयांच्या कमाईसह केवळ 16 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कोरोनानंतर धर्मा प्रॉडक्शनचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप होऊ लागले अलीकडे त्यांचा 'जिगरा'ही फारसा चालला नाही.उत्पादनाचा वाढता खर्च आणि सातत्याने कमी होत असलेला नफा यामुळे करण जोहर गेल्या काही वर्षांपासून धर्मा प्रोडक्शनमध्ये मोठ्या गुंतवणूकदाराच्या शोधात होता.
एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसपासून ते सारेगामा इंडिया आणि जिओ स्टुडिओसारख्या प्रोडक्शन हाऊसपर्यंतच्या गुंतवणूकदारांची नावं यामध्ये पुढे येत होती. पण आता या करारामुळे करण जोहरची नताशा पूनावाला आणि अन्य पूनावाला यांच्याशी असलेली घट्ट मैत्री त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरली असं म्हटलं जातंय.
करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनची जबाबदारी कधी घेतली?
करण जोहरचे वडील यश जोहर यांनी 1980 मध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा अभिनीत 'दोस्ताना' या प्रसिद्ध चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. दोन दशकांपूर्वी करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनची जबाबदारी स्वीकारली आणि नंतर आपल्या कंपनीला एका नव्या उंचीवर नेले.