एका चित्रपटात दिले 30 किसिंग सिन, तरी बॉलिवुडमध्ये जम बसलाच नाही, फ्लॉप राहिलेली 'ही' हिरोईन आता काय करते?
ही अभिनेत्री एका चित्रपटानंतर रातोरात नॅशनल क्रश बनली. एका चित्रपटात तिने 30 किसिंग सिन दिले होते. मात्र ती बॉलिवुडमध्ये फारशी कमाल करू शकली नाही.
मुंबई : बॉलिवुड हे असं जग आहे, जिथं एखाद्याचं नशीब चांगलंच फळफळतं तर एखाद्याला कठोर मेहनत घेऊनही यशस्वी होता येत नाही. या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी आतापर्यंत दिवसरात्र एक करून करिअर घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा जम काही बसला नाही. यामध्येच सोनल चौहान या अभिनेत्रीचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या अभिनेत्रीने एका चित्रपटात चक्क 30 किसिंग सिन दिले होते. पण तरीही तिच्या नशिबाने तिला साथ दिलीच नाही.
एका चित्रपटाने झाली नॅशनल क्रश
सोनल चौहान ही अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने ‘जन्नत’ (2008) या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट चांगलाच गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर तिला देशभरात प्रसिद्धी मिळाली. तिला नॅशनल क्रश मानले जाऊ लागले. पहिल्याच चित्रपटानंतर मिळालेल्या या यशानंतर ती बॉलिवुडमध्ये चांगलीच चमकेल असे सांगितले जाऊ लागले. मात्र ती या क्षेत्रात पुढे फार काही करू शकली नाही.
सोनल चौहान मुळची दिल्लीची
बॉलिवुडमध्ये जम बसत नसल्याचे दिसताच तिने आपला मोर्चा दाक्षिणात्त्य चित्रपटांकडे ळवला. ती सिनेसृष्टीत अजूनही सक्रिय आहे. ती एखाद्या चित्रपटात सहकलाकार म्हणून झळकते. मात्र मुख्य नायिका म्हणून ती अद्यापतरी एखाद्या मोठ्या चित्रपटात झळकलेली नाही. 16 मे 1987 रोजी सोनल चौहानचा जन्म झाला. ती मुळची नोएडा येथील आहे. नोएडा येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये सोनलने पुढचे शिक्षण घेतले. 2005 साली तिने मिस वर्ल्ड टूरिझम नावाचा खिताब पटकावला. अशा प्रकारचा खिताप पटकावणारी ती पहिली भारतीय आहे.
जन्नत चित्रपटाचा मोडला रेकॉर्ड
त्यानंतर सोनल चौहानने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. ती गायक हिमेश रेशमियाच्या आपका सुरूर या अल्बममधील ‘समझो न’ या गाण्यात पहिल्यांदा झळकली. त्यानंतर ती जन्नत (2008) या चित्रपटात इम्रान हाश्मी या अभिनेत्यासोबत प्रमुख नायिकेच्या रुपात दिसली. त्यानंतर सोनल चौहानने अनेक चित्रपटांत काम केलं. मात्र तिचे चित्रपट फारसे चालले नाही.
View this post on Instagram
चित्रपटात दिले 30 किसिंग सिन
सोनल चौहानचा 2013 साली 3जी- अ किलर कनेक्शन हा चित्रपट आला. या चित्रपटात नील नितिन मुकेश हा प्रमुख अभिनेता होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकला नाही. मात्र या चित्रटात तिने 30 किसिंग सिन दिले होते. इम्रान हाश्मीच्या मर्डर या चित्रपटात एकूण 20 किसिंग सिन होते. मात्र सोनल चौहानच्या या चित्रपटात एकूण 30 किसिंग सिन होते. म्हणजेच या चित्रपटाने मर्डर या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले होते.
हेही वाचा :
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
वर्षातला सर्वांत वादग्रस्त चित्रपट आता ओटीटीवर येणार, जाणून घ्या नेमका कुठे आणि कधी पाहता येणार?