वर्षातला सर्वांत वादग्रस्त चित्रपट आता ओटीटीवर येणार, जाणून घ्या नेमका कुठे आणि कधी पाहता येणार?
2024 या सालात या चित्रपटावर सर्वाधिक टीका झालेली आहे. आता हाच चित्रपट सिनेरसिकांना पाहण्यासाठी ओटीटीवर रिलिज होणार आहे.
The Sabarmati Report OTT Release: अभिनेता विक्रांत मेस्सी याची प्रमुख भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे. ट्रेलर आल्यापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. या चित्रपटात हाताळण्यात आलेला विषय अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळेच त्यावर अनेक टीका झाल्या. मात्र आता हा चित्रपट तुम्हाला ओटीटी माध्यमावरही पाहता येणार आहे.
नरेंद्र मोदी यांनीदेखील पाहिला होता चित्रपट
या चित्रपटात विक्रांत मेस्सीने समर कुमार हे पात्र साकारलेले आहे. तर या चित्रपटात राशी खन्ना, रिद्धी डोगरा असे दिग्गज कलाकार आहेत. राशी खन्नाने अमृता गिल तर रिद्धी डोगराने मनिका राजपुरोहित ही पात्रे साकारलेली आहेत. या चित्रपटाची कथा गोध्रा हत्याकांडावर आधरलेली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाल्यापासून त्यावर अनेक स्तरांतून टीका झाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ही टीका चांगलीच वाढली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हा चित्रपट पाहिलेला आहे. केंद्रीय मंत्र्यांसाठी या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी बडे नेते उपस्थित होते.
चित्रपटाची कथा नेमकी काय आहे?
दरम्यान, या चित्रपटावर वेगवेगळ्या स्तरातून टीका झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करू शकला नव्हता. आता मात्र हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. आता हाच चित्रपट 10 जानेवारी 2025 पासून ZEE5 या ओटीटी मंचावर पाहता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केलेले आहे. 2002 साली साबरमती एक्स्प्रेसशी निगडीत असलेल्या गोध्रा हत्याकांडावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाची ओटीटीवरील स्ट्रिमिंग टेट समोर आली असली तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाची कहाणी काय आहे?
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात एक पत्रकाराला दाखवण्यात आले आहे. हा पत्रकार 2002 साली झालेल्या गोध्रा ट्रेनच्या अग्निकांडाची माहिती काढतो. पुढे अनेक वर्षांनंतर या घटनेसंदर्भात दडून राहिलेल्या एका रिपोर्टबद्दल जेव्हा या पत्रकाराला समजते, तेव्हा हा चित्रपट रंजक वळण घेतो. त्यानंतर हा पत्रकार शक्तिशाली लोकांश सामना करत लोकांसमोर रिपोर्टमधील माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात विक्रांत मेसी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा, सुदीप वेद, हेला स्टिचल्मेयर, दिग्विजय पुरोहित, अभिशांत राणा, उर्वशी गोल्टर यांच्यासह इतरही दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा अर्जुन भांडेगांवकर, धीरज सरना, विपिन अग्निहोत्री आणि अविनाश सिंह तोमर यांनी लिहिलेली आहे. तर एकता कपूर, शोभा कपूर, अंशुल मोहन आणि अमूल वी मोहन यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.
हेही वाचा :