शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, मुंबईत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक केल्याचं एक प्रकरण पुढं आलं आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी मुंबईच्या जुहू पोलिस स्थानकात जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रामुळं (Raj Kundra Case) सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीही (Shilpa Shetty) चर्चेत आहे. या प्रकरणामुळं शिल्पा शेट्टीच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. शिल्पाची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. आता शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक केल्याचं एक प्रकरण पुढं आलं आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी (sunanda shetty) यांनी मुंबईच्या जुहू पोलिस (Mumbai Police) स्थानकात जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही एफआयआर दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
Raj Kundra Case : राज कुंद्राच्या अटकेची धग शिल्पापर्यंत, अनेक ब्रॅंड्स पाठ फिरवण्याची भीती
सुनंदा शेट्टी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मे 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळाता रायगडच्या कर्जत परिसरात चार हेक्टर जमिनीबाबत सुधाकर घारे नामक व्यक्तिशी व्यवहार झाला होता. काही काळानंतर सुनंदा शेट्टी यांना अशी माहिती कळली की, या जमिनीची कागदपत्रं बोगस आहेत आणि यासाठी 1 कोटी 60 लाख रुपये सुनंदा शेट्टी यांनी दिले होते.
ज्यावेळी सुनंदा शेट्टी यांनी सुधाकरला याविषयी विचारलं त्यावेळी सुधाकरनं पैसे परत द्यायला नकार दिला. तसेच खोट्या केसमध्ये अडकण्याची धमकी दिली आणि सुनंदा यांना कोर्टात जा असंही म्हटलं.
यानंतर सुनंदा शेट्टी अंधेरी कोर्टात गेल्या. तिथं कोर्टानं त्यांचं प्रकरण ऐकलं आणि जुहू पोलिसांना या प्रकरणात FIR दाखल करत चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी सुधाकर विरोधात 406, 409, 420, 462, 467, 468, 471, आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली आहे.
Pornography Case: चौकशीदरम्यान अनेकदा शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं; सलग अडीच तास प्रश्नोत्तरे