(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपं कपाट सापडलं, मिळाली महत्वाची माहिती
पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या (Raj kundra Case) कार्यालयात छुपी अलमारी सापडली आहे.काल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या व्हियान व जेएल स्ट्रीमच्या कार्यालयात पुन्हा छापा टाकला.
मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या (Raj kundra Case) कार्यालयात छुपी अलमारी सापडली आहे. काल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या व्हियान व जेएल स्ट्रीमच्या कार्यालयात पुन्हा छापा टाकला. त्या कार्यालयात गुन्हे शाखेला एक छुपं कपाट सापडलं आहे. क्राइम ब्रँचला या कपाटातून बऱ्याच बॉक्स फायली मिळून आल्या आहेत. गुन्हे शाखेला त्या फाईलमधील क्रिप्टो करन्सीशी संबंधित माहिती मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई क्राईम ब्रांचकडून तिघांना समन्स
पोनोग्राफी प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलनं तीन लोकांना समन्स बजावला आहे. मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ट (वंदना तिवारी) आणि अन्य दोघांना समन्स बजावत चौकशी साठी बोलावलं आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी गहना (वंदना तिवारी) ला अटक केलं होतं, आता ती जामिनावर बाहेर आहे. क्राईम ब्रांच दुसऱ्यांदा त्या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे जे आरोपी या प्रकरणात आधी अटक झाले होते आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
Pornography Case: चौकशीदरम्यान अनेकदा शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं; सलग अडीच तास प्रश्नोत्तरे
पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या उद्योगपती राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिल्पाचे जबाब नोंदवण्यात आला. गुन्हे शाखेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण जबाबादरम्यान शिल्पा शेट्टी तीन ते चार वेळा रडू लागली. अडीच तास गुन्हे शाखेने तिची चौकशी केली. राज कुंद्राने पोर्नोग्राफीचे काम केले आहे का? असा प्रश्न अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला. विशेष म्हणजे, राज कुंद्रावर अश्लील चित्रपट निर्मिती आणि अपलोड केल्याचा आरोप आहे.
गुन्हे शाखेने कोणते प्रश्न विचारले
- हॉटशॉट कोण चालवतो याबद्दल तुम्हाला माहिती आहे काय?
- लंडनमध्ये पॉर्न व्हिडिओ पाठविण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी वियानचे कार्यालय बर्याच वेळा वापरले गेले, याची तुम्हाला माहिती आहे का?
- सन 2020 मध्ये तुमचे चांगले शेअर्स असतानाही तुम्ही वियान कंपनीमधून बाहेर का आला?
- हॉटशॉटच्या व्हिडिओ सामग्रीबद्दल आपल्याला काय माहित आहे?
- वियान आणि कॅमरून यांच्यातील पैशांच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला माहिती आहे काय?
- आपण कधीही हॉटशॉटच्या कामात सहभागी होता?
- राज कुंद्राच्या सर्व कामांबद्दल माहिती आहे का? तो काय काम करतो, त्याचा व्यवसाय काय आहे?
- प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणे) यांच्याशी हॉटशॉटबद्दल तुम्ही कधी संवाद साधला आहे का?
- राज कुंद्राच्या पैशाच्या व्यवहाराबद्दल काय माहिती आहे?
- पोलिसांनी शिल्पाला अटक केलेल्या आरोपीच्या मोबाइलवरून काही गप्पा आणि मेसेज संदर्भात विचारले.