Sonu Sood with Fan : सोनू सूदचा जबरा फॅन! हैदराबादहून पायी निघालेला चाहता अखेर मुंबईत दाखल
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांना देव मानत देवाच्या दर्शनासाठी पायी जायचं असतं असे म्हणत व्यंकटेश हरिजन हा मुलगा हैदराबादवरून पायी चालत निघाला होता.
![Sonu Sood with Fan : सोनू सूदचा जबरा फॅन! हैदराबादहून पायी निघालेला चाहता अखेर मुंबईत दाखल Actor Sonu sood poses with a Fan who walked 700 kms to just meet the actor Sonu Sood with Fan : सोनू सूदचा जबरा फॅन! हैदराबादहून पायी निघालेला चाहता अखेर मुंबईत दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/10/eab3649a0f4f7508945e577e7af17993_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेकांची मदत केली. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीसाठी, आभार व्यक्त करण्यासाठी जमा होत असतात. असाच एक चाहता हैदराबादवरून आपल्या लाडक्या अभिनेत्यास भेटण्यासाठी पायी चालत निघालेला व्यंकटेश अखेर मुंबईत पोहोचला.
अभिनेता सोनू सूद यांना देव मानत देवाच्या दर्शनासाठी पायी जायचं असतं असे म्हणत व्यंकटेश हरिजन हा मुलगा हैदराबादवरून पायी चालत निघाला होता. जेव्हा ही गोष्ट अभिनेता सोनू सूदच्या लक्षात आली तेव्हा त्याने स्वतः फोन करून गाडीने येण्याची विनंती व्यंकटेशला केली. व्यंकटेश जवळपास 300 किलोमीटर अंतर चालत सोलापूरला पोहोचला. त्यावेळी व्हिडीओ कॉल करून अभिनेता सोनू सूदने गाडीने येण्याची विनंती पुन्हा केली. त्यावेळी आपल्या देवाची विनंती मान्य करत व्यंकटेश मुंबईला निघाला. आज (10 मे) संध्याकाळी अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबईतील निवासस्थानी व्यंकटेश याने त्यांची भेट घेतली. यावेळी सोनू सूदने इतर कोणीही असे करू नये आवाहन देखील या वेळी केले.
मूळचा तेलंगणा मधील दोरनापल्ली या गावातील रहिवासी असलेला व्यंकटेश हरिजन हा युवक आहे. 1 जून पासून तो दररोज सरासरी 40 किलोमीटर चालत होता. अभिनेता सोनू सूद हा देवप्रमाणे प्रत्येकाची मदत करतोय. देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं. त्यामुळे पायी निघालोय अशी भावना व्यंकटेश याने व्यक्त केली होती.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी पोहचवणं असो, शेतीसाठी अवजारांची मदत किंवा मग वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, अगदी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल लागणार असेल तर एक नाव तत्काळ समोर येतं अभिनेता सोनू सूद. लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्य गावी पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सूदने मदत केली. आतापर्यंत शेकडो परप्रांतीय मजुरांना, कामगारांना सोनूने त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. आजही सोनूने काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती
संबंधित बातम्या :
Sonu Sood Help : सुरेश रैना आणि नेहा धुपियाच्या मदतीला धावून गेला सोनू सूद, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा केला पुरवठा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)