एक्स्प्लोर

Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल

Iran War Live Update: अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावरील तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने सौदीतील अमेरिकन तळावर 5 टँकर विमाने निकामी केली आहेत.

Iran War Live Update: जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाणारी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) सध्या जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनली आहे. या सागरी मार्गावर इराणने आपले नियंत्रण घट्ट केले असून, अमेरिकेच्या वाढत्या लष्करी लष्करी हालचालींमुळे येथे कधीही मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग पूर्णपणे बंद केला नसला तरी, त्यांनी एक 'नवी चाल' खेळली आहे. इराण केवळ त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या आणि मित्रराष्ट्रांच्या जहाजांनाच या मार्गातून जाण्याची परवानगी देत आहे. दुसरीकडे, अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावरील तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने सौदीतील अमेरिकन तळावर 5 टँकर विमाने निकामी केली आहेत. या तणावामुळे होर्मुझमधून होणारी सर्वसामान्य वाहतूक ठप्प झाली असून जगाचा श्वास रोखला गेला आहे.

इराणची मोठी खेळी; 'युआन'मध्ये व्यवहाराची नवी अट!

'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार इराणने म्हटले आहे की, जर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून तुमची तेलाची जहाजे सुरक्षितपणे नेऊ द्यायची असतील, तर त्या तेलाचा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये न करता चीनच्या 'युआन' (Yuan) या चलनात करावा लागेल. जगभरात तेलाचा व्यापार प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्ये होतो. इराण आता डॉलरचे महत्त्व कमी करून चीनच्या चलनावाढ देण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इराण आणि चीनचे संबंध जवळचे आहेत. चीनच्या चलनावर व्यापार केल्यास इराणवर असलेल्या अमेरिकन निर्बंधांचा परिणाम कमी होईल, असाही यामागे अंदाज असू शकतो. तथापि, इराण सर्वांनाच रस्ता मोकळा करून देणार नाही, तर जे देश ही अट मान्य करतील, अशाच मर्यादित जहाजांना तिथून जाता येईल. 

भारतासाठी दिलासा मिळाला?

दरम्यान, संपूर्ण जग ऊर्जा संकटाने 'गॅस'वर आलं असतानाच भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर मोठा विजय मिळवल्याचे बोलले जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेनंतर, भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना 'सुरक्षित मार्ग' (Safe Passage) देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काल रात्रीच भारताचे 'शिवालिक' हे एलपीजी जहाज कोणतीही अडचण न येता हा मार्ग पार करून सुरक्षितपणे बाहेर पडले. मात्र, तरीही सावधगिरी म्हणून भारताने रशियाकडून येणाऱ्या तेलाचे प्रमाण वाढवले आहे.

अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई

दुसरीकडे, इराणच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने आता आपली ताकद पणाला लावली आहे. अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक आणि 3 बलाढ्य युद्धनौका फायटर जेट्सच्या ताफ्यासह आखाती देशांकडे रवाना झाल्या आहेत. अमेरिकन नौदल व्यापारी जहाजांना लष्करी संरक्षण देऊन या मार्गातून नेण्याची तयारी करत आहे का? असाही सवाल उपस्थित झाला आहे. ज्यामुळे इराण आणि अमेरिका आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.

जगावर आर्थिक संकट

या नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर तेल 200 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका युरोपीय देशांना बसत असून अनेक देशांत इंधन रेशनिंग सुरू झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
Israel Attack Lebanon: इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
US Iran War Ceasefire : मध्यस्थीसाठी पुढाकार घेणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने तोंडघशी पाडले; इस्रायलनेही सुनावलं, नेमकं काय घडलं?
मध्यस्थीसाठी पुढाकार घेणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने तोंडघशी पाडले; इस्रायलनेही सुनावलं, नेमकं काय घडलं?
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Shubman Gill: अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Washington Sundar: गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
Tamilnadu Custodial Deaths: बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
Embed widget