एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime News: टिपू पठाण आणि त्याची टोळी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल चालक आणि मटण दुकानदारांना लक्ष्य करत होती.

पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वात दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी आपली 'धडाकेबाज' मोहीम सुरूच ठेवली आहे. काळेपडळ पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या सात साथीदारांवर तिसऱ्यांदा मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी या टोळीतील एका फरारी साथीदारालाही बेड्या ठोकल्या आहेत.

मटण दुकानदारांना धमकावून खंडणीचा धंदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिपू पठाण आणि त्याची टोळी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल चालक आणि मटण दुकानदारांना लक्ष्य करत होती. ही टोळी दुकानदारांकडे जाऊन "मी सांगेन त्याच दुकानातून मटण खरेदी करायचे" अशी सक्ती करत असे. तसेच, हॉटेल व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल, तर दरमहा ५ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली जात होती. पैसे न देणाऱ्यांना जीवे मारण्याची भीती दाखवून ही टोळी दहशत माजवत होती.

कार्यालय बोलावून दिली धमकी

सय्यदनगरमधील ख्यॉजा मंजिल येथील आपल्या कार्यालयात एका हॉटेल मालकाला बोलावून, टिपू पठाणने त्याला स्वतःच्या भागीदारीतील मटण दुकानातून खरेदी करण्यासाठी दबाव टाकला आणि खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून दुकानदारांनी काळेपडळ पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर १६ फेब्रुवारी २०२६ रोजी टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर यापूर्वी दोन वेळा जागा बळकावून खंडणी उकळल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे (वेळेत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने) त्यांना जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर येताच या टोळीने पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू केले. याची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्तांनी या टोळीवर तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लावला आहे.

फरारी साथीदार 'पच्चीस' जेरबंद

या गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फरारी असलेला टिपूचा साथीदार फैजान ऊर्फ पच्चीस रमजान ऊर्फ कादर शेख (वय २१, रा. सय्यदनगर) याला काळेपडळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू असून, या कारवाईमुळे खंडणीखोर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget