एक्स्प्लोर

Phula Marathi Film: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोकसंगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार, 'फुला' सिनेमाचं पोस्टर, संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

Phula Poster And Music Launch Ceremony: ज्येष्ठ पत्रकार, एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत 'फुला' या चित्रपटाचे पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

Phula Poster And Music Launch Ceremony: वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी "फुला" या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील तरुण, काही तरी नवीन करू पाहणाऱ्या नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे. 

ज्येष्ठ पत्रकार, एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत 'फुला' या चित्रपटाचे पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच सॅक्सोफोन वादक राज सोडा हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी 'फुला' या सिनेमाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.  चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर  आणि सृष्टी जाधव  यांचे आहे. वेशभूषाकार  कोमल जावीर, अक्षता पाटील  असून रंगभूषाकार समाधान भोरे  यांनी काम पाहिले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यावेळी बोलताना म्हणाले की, "आपल्या सर्वांना आपल्या लोककला, लोकपरंपरा याचा अभिमान असतो. ज्या कलाकारांना डोक्यावर घेऊन आपण ज्या कलाकारांचं कौतुक करतो अशा कलाकारांचं प्रत्यक्षातील आयुष्य कस असतं यावर प्रत्यक्षपणे प्रकाश टाकण्याचं प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नव्या दमाच्या तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट केला आहे. वाघ्या मुरळींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटाला आपण प्रेक्षक म्हणून नक्कीच साथ दिली पाहिजे..."

'फुला' ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग, डर्बीचा थरार ही सात गाणी या चित्रपटात आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यातून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचं चित्रण करत मुरळीच्या भावभावनाही मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अस्सल लोकसंस्कृती आणि आशयघन गाणी असलेला 'फुला' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव ठरणार आहे. येत्या 17 एप्रिलपासून 'फुला' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget