Natasa Stankovic Flaunt In Yellow Bikini: बिकिनीमध्ये दिसली हार्दिक पांड्याची EX-वाईफ नताशा, फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, लेकासोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय
Natasa Stankovic Flaunt In Yellow Bikini: नताशा स्टॅनकोविक आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना वेड लावून सोडलंय. नताशानं आता बिकिनीमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

Natasa Stankovic Flaunt In Yellow Bikini: टीम इंडियानं (Team India) वर्ल्डकप (T20 World Cup 2026) जिंकला, पण सध्या चर्चा रंगल्यात ते संघाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya). टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्यानं मैदानातच गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत (Mahieka Sharma) सेलिब्रेशन केलं आणि नेमकं तेच सेलिब्रेशन त्याच्या अंगलट आलंय. इथे हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या आहेत, पण, त्याची एक्स वाईफ मात्र सध्या व्हेकेशन एन्जॉय करतेय.
हार्दिक पांड्याची एक्स वाईफ, नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) हिनं घटस्फोटानंतर आपलं आयुष्य नव्यानं आणि आनंदानं जगण्यास सुरुवात केली. आपल्या मुलासोबत ती आपलं आयुष्य अगदी मनसोक्तपणे जगतेय. सध्या ती तिच्या लेकासोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय. गेल्या काही दिवसांपासून, नताशा तिचा मुलगा अगस्त्य याच्यासोबत व्हेकेशनवर आहे. आपल्या व्हेकेशनचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करतेय.
बिकिनीमध्ये नताशाचा 'स्वॅग'
नताशानं तिच्या व्हेकेशनचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नताशा पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसतेय. तिनं आपले केस नीटनेटके बांधून 'स्लीक बन' केला आहे आणि गॉगल लावून आपला बिकिनी लूक पूर्ण केला आहे. त्यासोबतच एका मुलाची आई असलेली नताशा आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय आणि तिचे चाहते तिच्या या अदांवर पूर्णपणे फिदा झाले आहेत.

नताशानं बिकिनी वेअर करून क्लासी पोझ दिली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं तिचं गोड हसू स्पष्टपणे दिसतंय. नताशानं तिचं व्हेकेशन लोकेशन रिवील केलेलं नसलं, तरीसुद्धा तिच्या फोटोंच्या बॅकग्राउंडला दिसणारं निसर्गदृश्य अत्यंत नयनरम्य आहे. सभोवतालची हिरवीगार झाडी आणि डोक्यावर दाटलेले ढग यामुळे तिचं हे व्हेकेशन लोकेशन अधिकच सुंदर दिसतंय.

नताशानं तिचा मुलगा अगस्त्य याचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये अगस्त्य समुद्रकिनाऱ्यावर निवांतपणे बसून, तिथल्या सुंदर निसर्गदृश्याचा आनंद घेताना दिसतोय. नताशा आपल्या मुलासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवतेय. त्यासोबतच तिच्या आणि तिच्या मुलामधील घट्ट नातं या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















