एक्स्प्लोर

Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण

Satara News: पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४२) यांना सिक्कीममधील चीन सीमेवर 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' अंतर्गत कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.

पाटण (सातारा): सातारा जिल्हा हा शौर्य आणि बलिदानाची परंपरा असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच मातीतील आणखी एका सुपुत्राने देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च (Satara News) बलिदान दिले आहे. पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४२) यांना सिक्कीममधील चीन सीमेवर 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' अंतर्गत कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. तब्बल २३ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले.(Satara News)

कर्तव्य बजावताना काळाचा घाला

शहीद बाळकृष्ण निकम हे भारतीय सैन्यदलात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती सिक्कीम येथील अतिदुर्गम आणि उणे तापमानातील चीन सीमेवर होती. 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' सारख्या कठीण मोहिमेवर असताना, निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देताना त्यांना वीरमरण आले. ही बातमी शुक्रवारी लष्करी मुख्यालयातून त्यांच्या गावी कळवण्यात आली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण पाटण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.(Satara News)

पिंपळोशी गावावर शोककळा

"आपला बाळकृष्ण शहीद झाला," ही बातमी समजताच पिंपळोशी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. निकम कुटुंबीयांच्या घरासमोर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शहीद बाळकृष्ण हे सुट्टीवर आल्यावर गावातील प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत सर्वांशी आपुलकीने आणि मनमोकळेपणाने मिसळायचे. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचा आधार गेला नाही, तर गावाने आपला एक लाडका सुपुत्र गमावला आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

निकम यांच्या निधनामुळे त्यांच्या घरातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. वृद्ध आईचा हंबरडा आणि वडिलांच्या डोळ्यांतील न थांबणारे अश्रू पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. शहीद बाळकृष्ण यांच्या मागे आई, वडील, पत्नी पूनम, भाऊ शिवराज आणि बहीण रूपाली असा परिवार आहे. विशेषतः त्यांची अर्णव आणि प्रणव ही दोन लहान मुले आपल्या वडिलांच्या परतण्याची वाट पाहत होती, हे दृश्य पाहून पिंपळोशी गावातील प्रत्येक डोळा पाणावला होता.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुण्यात आणि तेथून रुग्णवाहिकेने त्यांच्या मूळ गावी पिंपळोशी येथे आणले जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहीद निकम यांना शासकीय इतमामात आणि लष्करी लवाजम्यासह अखेरचा निरोप देण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक या वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा धसका की खरंच दूध खराब? साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले शेकडो लिटर दूध; Video Viral
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget