एक्स्प्लोर

विराट मॅचआधी Relax होण्यासाठी बघतो 'हे' 2 सिनेमे, दोन्ही Box Officeवर सपशेल आपटलेत, दिग्दर्शकानं सांगितलं..

Virat Kohli: एका जाहिरातीत विराट कोहलीसोबत क्रिस गेल आणि शेन वॉटसनदेखील दिसले होते. त्या वेळी प्रियदर्शन यांनी विराटच्या अभिनयाचं कौतुकही केलं होतं.

Virat Kohli: भारतीय सिनेसृष्टीत कॉमेडी चित्रपटांचा विषय निघाला की दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेले आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारे चित्रपट दिले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सामन्याआधी रिलॅक्स होण्यासाठी एक खास बॉलीवूड चित्रपट पाहतो, अशी माहिती समोर आली आहे. (Bollywood)

या संदर्भात प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की 2007 मध्ये प्रदर्शित झालेले दोन चित्रपट थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवू शकले नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नव्हती. तरीही काळाच्या ओघात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. अगदी विराटही हे चित्रपट सामना खेळण्याआधी रिलॅक्स होण्यासाठी पाहतो.

“माझ्याकडे आता नव्या आयडियाच नाहीत”

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शन यांनी सांगितलं की आता त्यांना कॉमेडी चित्रपट बनवण्यात फारसा रस राहिलेला नाही. ते म्हणाले, “खरं सांगायचं तर आता मला गंभीर चित्रपट बनवायला जास्त आवडतं. कॉमेडी चित्रपट मी आता जणू अपरिहार्यता म्हणून बनवतो. मला वाटतं की माझ्याकडे नवीन आयडिया उरलेल्या नाहीत. मी आधी केलेल्या गोष्टी पुन्हा करायच्या नाहीत. अजून कदाचित एक कॉमेडी चित्रपट करेन आणि मग थांबेन.”

सामन्याआधी विराट पाहतो..

प्रियदर्शन यांनी सांगितलं की त्यांचा 2007 मध्ये आलेला ढोल  आणि 2010 मध्ये आलेला खट्टा मिठा हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आता या चित्रपटांना नव्याने प्रेक्षक मिळत आहेत. ते म्हणाले , “मला हे दोन्ही चित्रपट खूप आवडतात. पण थिएटरमध्ये ते चालले नाहीत. आता ओटीटीमुळे लोक पुन्हा ते पाहत आहेत. मला आनंद होतो जेव्हा लोक सांगतात की विराट कोहलीसारखे खेळाडू सामना खेळण्याआधी रिलॅक्स होण्यासाठी ‘ढोल’ पाहतात. ते तर चित्रपटातील डायलॉगही एकमेकांना म्हणतात.”

विराट आणि प्रियदर्शन यांनी एकत्रही केलं काम

जरी विराट कोहलीने सार्वजनिकरित्या हा चित्रपट पाहतो असं सांगितलेलं नसले, तरी तो आणि प्रियदर्शन यांचं आधी एकत्र काम झालं आहे. आयपीएलमधील रॉयल  चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी बनवलेल्या एका जाहिरातीचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. या जाहिरातीत विराट कोहलीसोबत क्रिस गेल आणि शेन वॉटसनदेखील दिसले होते. त्या वेळी प्रियदर्शन यांनी विराटच्या अभिनयाचं कौतुकही केलं होतं.

‘ढोल’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘ढोल’ या चित्रपटात तुषार कपूर, शरमन जोशी,राजपाल यादव,कुणाल खेमू आणि तनुश्री दत्ता यांसारखे कलाकार होते. या चित्रपटाने भारतात सुमारे 15 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरात त्याचा कलेक्शन सुमारे 23 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget